Rameswaram Cafe Blast : व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी पाच जणांना अटक

व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या अनेक भागात छापे टाकून पाच जणांना अटक केली.
nia action Five arrested in connection with Rameswaram Cafe blast in Whitefield
nia action Five arrested in connection with Rameswaram Cafe blast in WhitefieldSakal
Updated on

बंगळूर : व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या अनेक भागात छापे टाकून पाच जणांना अटक केली. एनआयए अधिकाऱ्यांनी चेन्नईतील सिद्दयाल टाऊन व बिदरियार मंदिराजवळील घरांवर छापे टाकले.

अटक केलेल्या पाच जणांची अज्ञात ठिकाणी चौकशी केली. चेन्नईत अटक करण्यात आलेल्या चौघांचे कुख्यात दहशतवादी नझीरशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास सुरू आहे. समशुद्दीनच्या घरावर रामनाथपुरम जिल्ह्यातील किलाकराई भागात छापा टाकला. सध्या परप्पन अग्रहार तुरुंगात असलेला नजीर हा तुरुंगातून कट रचणारा दहशतवादी आहे.

पोलिसांनी सय्यद सोहेल, जाहिद, मुदासीर, उमर, फैजल यांना ग्रेनेड, पिस्तूल आणि जिवंत गोळ्यांसह अटक केली. त्यांच्याकडून सात पिस्तुले, काडतुसे, पंधरा मोबाईल, २० हून अधिक सिमकार्ड जप्त केले.

दरम्यान, कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणानंतर पुन्हा बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. २.५ दशलक्ष डॉलर्सची खंडणी दिली नाही, तर रामेश्वरम कॅफेप्रमाणे बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.