Jammu Kashmir : २०१९ पासून तिहार जेलमध्ये असलेल्या नेत्याला खासदारकीची शपथ घेण्यास NIAने दिली परवानगी; 'हे' आहेत आरोप

Rashid engineer Latest News : शपथ घेण्यासाठी इंजिनिअर यांना तुरुंगाबाहेर आणले जाणार आहे, मात्र त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही
Rashid engineer Latest News
Rashid engineer Latest News
Updated on

नवी दिल्ली, ता. १ ः जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या राशिद इंजिनिअर यांना खासदारकीची शपथ घेण्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) परवानगी दिली आहे. दहशतवादासाठी आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी २०१९ पासून इंजिनिअर हे दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. पाच जुलै रोजी ते खासदारकीची शपथ घेऊ शकतात, असे एनआयएकडून सोमवारी सांगण्यात आले.

शपथ घेण्यासाठी इंजिनिअर यांना तुरुंगाबाहेर आणले जाणार आहे, मात्र त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही, असे ‘एनआयए’कडून स्पष्ट करण्यात आले. इंजिनिअर यांना अंतरिम जामीन देण्याबाबत पटियाला हाऊस न्यायालय मंगळवारी आदेश जारी करणार असल्याचे समजते. राशिद इंजिनिअर तसेच खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग या दोघांनी तुरुंगात राहून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

Rashid engineer Latest News
Modi on Rahul Gandhi: लोकसभेत राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या विधानावर PM मोदींची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, संपूर्ण हिंदू...

राशिद इंजिनिअर यांनी या आधी दोनवेळा लंगेट विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र तुरुंगात असूनही त्यांनी बारामुल्ला मधून विजय मिळवला. इंजिनिअर यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला तसेच सज्जाद गनी लोन यांना पछाडत विजय प्राप्त केला आहे. इंजिनिअर यांना ४५.७० टक्के तर अब्दुल्ला यांना २५.९५ टक्के मते मिळाली होती.

Rashid engineer Latest News
Rohit Sharma on his Retirement: 'मला निवृत्ती घेऊ वाटत नव्हती पण...', रोहित शर्माने रिटायरमेंटबाबत केला मोठा खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.