Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) हैदराबाद (Hyderabad) हेरगिरीप्रकरणी संशयित नुरुद्दीन ऊर्फ ​​रफी याला अटक केली.
Pakistan Espionage Case
Pakistan Espionage Caseesakal
Updated on
Summary

आता नुरुद्दीनला एनआयएच्या पथकाने अटक केली आहे. सात मे २०२४ रोजी न्यायालयाने त्याला गुन्हेगार घोषित केले होते.

बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) हैदराबाद (Hyderabad) हेरगिरीप्रकरणी संशयित नुरुद्दीन ऊर्फ ​​रफी याला अटक केली. नुरुद्दीन जामिनावर बाहेर आला असून, तो अनेक दिवस बेपत्ता होता. त्याला म्हैसूरच्या राजीवनगरमध्ये अटक करण्यात आले आहे. नुरुद्दीनवर ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बुधवारी एनआयए अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव त्याच्या राजीवनगर येथील घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आदी वस्तू जप्त केल्या. नुरुद्दीन ऑगस्ट २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता आणि चेन्नईतील विशेष एनआयए न्यायालयात (NIA Court) हजर न होता तो फरार झाला होता.

Pakistan Espionage Case
Crime News : प्रेम प्रकरणातून तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून; बहिणीसमोरच भररस्त्यात प्रियकराला भोसकले

या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपी नुरुद्दीनविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आता नुरुद्दीनला एनआयएच्या पथकाने अटक केली आहे. सात मे २०२४ रोजी न्यायालयाने त्याला गुन्हेगार घोषित केले होते. २०१४ मध्ये बंगळूरमधील इस्रायलचा दूतावास आणि चेन्नईतील अमेरिकन दूतावास उडवण्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Pakistan Espionage Case
Sangli Crime : गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'कडून कॅफेची तोडफोड

२०१४ मध्ये एनआयए अधिकाऱ्यांनी श्रीलंकन ​​नागरिक मोहम्मद साकीर हुसेन आणि पाकिस्तानी नागरिक अमीर जुबेर सिद्दीकी, कोलंबो येथील पाकिस्तानच्या राजनैतिक कार्यालयातील कर्मचारी यांना अशाच आरोपाखाली अटक केली होती. आरोपींना बनावट भारतीय नोटांचा पुरवठा करून दहशतवादी कृत्यांना मदत आणि प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली नुरुद्दीनवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी नुरुद्दीनने बनावट नोटा चलनात आणून या कृत्यासाठी आवश्यक निधी उभारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.