नवी दिल्ली- राष्ट्रीय तपास यंत्रणेने बेंगळुरुतील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, बल्लारीच्या कोल बाजारमधून शब्बीर नावाच्या एका व्यक्तीला चौकशीसाठी एनआयएने ताब्यात घेतलंय. (NIA detained a key suspect for questioning in Bengaluru Rameshwaram Cafe blast case)
संशयिताला त्याच्या ट्रव्हल हिस्ट्रीवरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएला असा संशय आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा Popular Front of India (PFI) एक सक्रीय सदस्य या बॉम्बस्फोटाच्या कटाचा सूत्रधार आहे. संशयिताचे दहशतवादी संघटनांशी जवळचे संबंध आहेत. पीएफआयने अनेक लोकांचे ब्रेनवॉश केले आहे. त्यामध्ये आरोपीचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.
एनआयएने काही दिवसांपूर्वी संशयिताचे फोटो समोर आणले होते. आरोपीला शोधून देण्याचे आवाहन यंत्रणेकडून लोकांना करण्यात आले होते. शिवाय आरोपीला पकडून देणाऱ्यास बक्षीसाची देखील घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर एएनआयला आज मोठे यश मिळाल्याचं बोललं जात आहे.
आरोपीला पकडण्याठी एनआयएने 08029510900, 8904241100 या मोबाईल क्रमांकावर किंवा info.blr.nia@gov.in या वेबसाईटवर कळवण्याचे आवाहन केले होते.आरोपीचा फोटो यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आला होता. आरोपीने एका बसमधून प्रवास केला होता. यावेळी त्याच्या तोंडावर मास्क लावलेला दिसत होता. त्यानंतर यंत्रणेला तो मशिदीजवळ आढळून आला होता.
1 मार्च रोजी एक व्यक्ती रामेश्वरम कॅफेमध्ये आला होता. त्याने आपल्या जवळील एक बॅग कॅफेतच ठेवली. त्यानंतर तो कॅफेतून बाहेर पडला. त्यानंतर जवळपास एक तासाने कॅफेमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले होते. बेंगळुरुमधील रामेश्वरम कॅफे हा प्रसिद्ध आहे. कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली होती.
मागील आठवड्यात शुक्रवारपासून रामेश्वरम कॅफे पुन्हा सुरु झाले आहे. कॅफेचे मालक राघवेंद्र राव यांनी सांगितलंय की, कॅफेमध्ये कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पुढे अशा घटना घडू नयेत याची काळजी घेण्यात येईल. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.