NIA कडून खलिस्तानी दहशतवाद्याला झटका! भारतीयांना कॅनडा सोडायला लावणाऱ्या पन्नूची संपत्ती जप्त, 'या' ठिकाणी होती मालमत्ता

भारताविरुद्ध तरुणांचा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करणारा आणि कॅनडामध्ये भारतीयांना निघून जाण्याचा इशारा देणाऱ्या गुरपतवंत सिंह पन्नू याची संपत्ती जप्त करण्यात आली.
NIA कडून खलिस्तानी दहशतवाद्याला झटका! भारतीयांना कॅनडा सोडायला लावणाऱ्या पन्नूची संपत्ती जप्त, 'या' ठिकाणी होती मालमत्ता
Updated on

Canada Vs India:कॅनडातून भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या पंजाब आणि चंदीगडमधील मालमत्ता सरकारने जप्त केल्या आहेत. पन्नू हा प्रतिबंधित संघटनेचा शिख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख आहे. तो कॅनडा आणि इतर देशांना भारतविरोधी बोलत राहतो. नुकत्याच झालेल्या कॅनडा-भारत वादात त्यांनी कॅनडात राहणाऱ्या हिंदूंनाही धमकावले होते.

पन्नूच्या मालकीची संपत्ती जप्त

एनआयएने अमृतसरच्या खानकोट गावात पन्नूची ४६ कनाल किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. ही शेतजमीन आहे.चंदीगडच्या सेक्टर १५ सीमध्ये पन्नूचे घर आहे. ते 2020 च्या आधी संलग्न करण्यात आले होते. आता एनआयएने त्यांना ताब्यात घेतले आहे. कायदेशीररित्या, पन्नू आता या मालमत्तांचे मालक नाहीत. ही मालमत्ता आता सरकारची आहे.

पन्नूला २०२० मध्ये दहशतवाद

भारत सरकारने पन्नूकडून चालवण्यात येणाऱ्या एसएपजेवर २०१९मध्ये UAPA अंतर्गत दहशवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली कठोर कारवाई करत बंदी घालण्यात आली होती. गृह मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की शीखांसाठी सार्वमताच्या नावाखाली SFJ पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि अतिरेकी विचारसरणीला पाठिंबा देत आहे.

2020 मध्ये, पन्नूवर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे घेण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप होता. यानंतर 1 जुलै 2020 रोजी केंद्र सरकारने पन्नूवर UAPA अंतर्गत दहशतवाद्याचा ठपका लावण्यात आला. केंद्र सरकारने २०२०मध्ये पन्नूशी निगडीत सर्व यू-ट्यूब चॅनल्सवर बंदी घातली होती.(Latest Marathi News)

NIA कडून खलिस्तानी दहशतवाद्याला झटका! भारतीयांना कॅनडा सोडायला लावणाऱ्या पन्नूची संपत्ती जप्त, 'या' ठिकाणी होती मालमत्ता
Amit Shah: सहकार संदर्भहीन होतोय हा गैरसमज डोक्यातून काढा, तो आणखी तेजाने उजळणार; अमित शाहांना विश्वास

पन्नू विरुद्ध सुमारे 12 खटले

SFJ आणि पन्नू यांच्यावर भारतात सुमारे डझनभर खटले दाखल झाले आहेत. यामध्ये पंजाबमधील देशद्रोहाच्या तीन प्रकरणांचा समावेश आहे. पंजाब पोलिसांनी तयार केलेल्या डॉजियरमध्ये एसएफजेने सोशल मीडियावर अनेक वर्षांपासून केलेल्या फुटीरतावादी पोस्टची माहिती आहे. यामध्ये तो दहशतवाद्यांना पाठिंबा देताना दिसतो.

पन्नू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो पंजाबी भाषेत ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश जारी करतो. ज्यामध्ये तो पंजाबी तरुणांना भारताविरोधात भडकावतो. एवढेच नाही तर पैशाचे आमिष दाखवून पंजाब आणि हरियाणामधील सरकारी इमारतींवर खलिस्तानचा झेंडा लावण्याचं आवाहन देखील करतोय. याशिवाय नुकत्याच झालेल्या G20 बैठकीदरम्यान त्यांनी दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर खलिस्तानी घोषणाही लिहिल्या होत्या. तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो. (Latest Marathi News)

NIA कडून खलिस्तानी दहशतवाद्याला झटका! भारतीयांना कॅनडा सोडायला लावणाऱ्या पन्नूची संपत्ती जप्त, 'या' ठिकाणी होती मालमत्ता
भाजपचा मेगाप्लॅन! लोकसभेसाठी माधुरी दिक्षीत, उज्ज्वल निकम, सुनिल देवधर यांची 'या' मतदारसंघासाठी चाचपणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()