नवी दिल्ली, चंडीगड : देशभरातील कोरोना (Corona) वाढत चालला असल्याने विविध राज्यांनी आता खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध अधिक कठोर करायला सुरूवात केली. पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. आता उत्तरप्रदेशमध्येही देखील वीकेंड कर्फ्यू लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
झारखंडमध्ये शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निर्बंधांबाबत उद्या (ता.५) रोजी निर्णय होऊ शकतो.मुंबई आणि दिल्लीतील संसर्ग वाढत असल्याने पश्चिम बंगाल सरकारने आठवड्यातून तीन वेळाच या शहरांसोबतची विमानसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब सरकारने रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला असून सिनेमागृहे आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवली जातील. रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत लोकांना अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडता येणार नाही.
३३ डॉक्टरांना संसर्ग
डॉक्टरांना देखील कोरोनाचा संसर्ग होऊ लागला असून उत्तरप्रदेशातील लखनौच्या मेदांता रुग्णालयातील ३३ डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब उघड झाली आहे..
यूपी तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
अलाहाबाद ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी माहिती उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी आज दिली.
देशभरात ...
तृणमूलचे नेते बाबूल सुप्रियो व कुटुंबीयांना संसर्ग
नालंदा वैद्यकीय महाविद्यालयातील ७२ डॉक्टर पॉझिटिव्ह
दिल्लीत ‘एम्स’ने डॉक्टरांच्या हिवाळी सुट्ट्या रद्द केल्या
भाजप नेते मनोज तिवारी कोरोना पॉझिटिव्ह
छत्तीसगडमध्ये ‘सीआरपीएफ’च्या ३८ जवानांना संसर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.