INDORE mp crime- इंदौरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक जाम गेटजवळ धक्कादायक घटना घडली आहे. दोन तरूण लष्करी अधिकारी आपल्या दोन मैत्रिणींसोबत नाईट ड्राईव्हला गेले होते. यावेळी त्यांच्या एका मैत्रिणीवर बंदुक रोखून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सहा जणांची ओळख पटवली आहे. जंगलातून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. टोळीच्या हल्ल्यामध्ये दोन्ही लष्करी अधिकारी जखमी झाले आहेत. यातील एका अधिकाऱ्याने जखमी अवस्थेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत कळवलं होतं. पण, जोपर्यंत ते पोहोचले तोपर्यंत एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.