Indo-Canada:हरदीप निज्जर गुरुद्वाऱ्यांमधील पैसा कॅनडाच्या पंतप्रधानाच्या पक्षाला देत होता, काँग्रेस खासदाराचा गौप्यस्फोट

'निज्जरसारखे लोक पंजाबच्या नसांमध्ये ड्रग्ज टोचताय', पंजाबच्या खासदाराचा खलिस्तान्यांवर आरोप
Hardeep Singh Shot Dead
Hardeep Singh Shot Dead
Updated on

Hardeep Singh Nijjar:भारत आणि कॅनडामधील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. कॅनडाने नुकताच खलिस्तानी फुटीरवादी नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या षडयंत्राचा आरोप भारतावर लावला होता. कॅनडाने लावलेला हा आरोप भारताने फेटाळून लावत तथ्यहीन असल्याचा दावा केला. दोन्ही देशांनी आपल्या राजन्यायिकांना आपआपल्या देशात परत बोलवलं आहे. अशातच, काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी कॅनडाच्या परिस्थितीची तुलना पाकिस्तानशी केली आहे.

दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीवर काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, "हरदीप सिंह म्हणाले की, "हरदीप सिंग निज्जर हा माझ्या आजोबांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचा उजवा हात होता. 1993 मध्ये जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याला तिथलं नागरिकत्व मिळाले. निज्जर याचा समावेश सर्वात मोठ्या १० गुंड आणि ड्रग्ज तस्करांमध्ये होता. उर्वरित आठ कॅनडात बसले आहेत. पाकिस्तानची जी प्रतिमा होती, ती आता कॅनडाने घेतली आहे."

काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून तेथील विद्यार्थ्यांच्या समस्यांची माहिती दिली आहे. ते म्हणाले, "मी काल संसदेत पंतप्रधान मोदींशी कॅनडातील विद्यार्थ्यांबद्दल चर्चा केली होती की कॅनडात भारतातील सात लाख विद्यार्थी आहेत, त्यापैकी 5 लाख पंजाबचे आहेत. हे विद्यार्थी खूप अडचणींचा सामना करून तिथे गेले. कोणालातरी आपली जमीन विकावी लागली. अशा स्थितीत त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. यावर पंतप्रधानांनी मला सांगितले की ते काळजी घेतील." (Latest Marathi News)

कॅनडात बसलेले निज्जरसारखे लोक पंजाबच्या नसांमध्ये ड्रग्ज टोचण्याचे काम करत असल्याचा आरोप बिट्टू यांनी केला. काँग्रेस खासदार म्हणाले, "निज्जर आणि कंपनीने तेथील गुरुद्वारांचा ताबा घेतला आहे. त्या गुरुद्वारांमधून मिळणारा सर्व पैसा ट्रुडो यांच्या पक्षाला जातो."

Hardeep Singh Shot Dead
India-Canada row: कॅनडा दहशतवादी-कट्टरतावाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान; भारताकडून जस्टिन ट्रूडो यांच्यावर हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.