''फरार मल्ल्या-नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करणार''

Boris Johnson
Boris Johnsonesakal
Updated on
Summary

'कायदा चुकवून जे लोक आपल्या देशात येतात, त्यांचं स्वागत आम्हाला कधीच करायचं नाही.'

दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. फरारी नीरव मोदी (Nirav Modi) आणि विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांच्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, मला या दोघांनाही भारताच्या स्वाधीन करायचं आहे. कारण, कायदा चुकवून जे लोक आपल्या देशात येतात, त्यांचं स्वागत आम्हाला कधीच करायचं नाही, असं त्यांनी नमूद केलंय.

जॉन्सन पुढं म्हणाले, तुम्ही ज्या दोन व्यक्तींबद्दल बोलत आहात, आम्हाला त्यांना भारतात परत पाठवायचं आहे. पण, काही कायदेशीर बाबी आहेत. त्यामुळं कायदा चुकवून जे लोक आपल्या देशात येतात, त्यांचं स्वागत आम्हाला कधीच करायचं नाही. आम्ही त्या दोघांवर योग्य ती कारवाई करु, असंही त्यांनी सांगितलं.

Boris Johnson
मोठी बातमी! मुख्यमंत्री सोरेन यांच्या मालमत्तेची ईडीव्दारे होणार चौकशी

याशिवाय, जॉन्सन यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबतही (Russia-Ukraine war) सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, पुढील आठवड्यापासून कीवमध्ये पुन्हा एकदा यूके दूतावास उघडला जाईल. मारियुपोलमध्ये ज्या पद्धतीनं कारवाई केली गेली, ती पूर्णपणे रशियाच्या विरोधात जाते. पण तरीही आता आम्ही पुन्हा कीवमध्ये आमचा दूतावास उघडणार आहोत. भारताच्या भूमिकेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, भारताचे रशियाशी जुने संबंध आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. रशियाबाबत भारताची भूमिका सर्वांना माहिती आहे. भविष्यात त्यात कोणताही बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.