निर्भयाची वकील लढवणार हाथरस पीडितेची केस; पण...

nirbhaya lawyer seema kushwaha will fight hathras rape victim case
nirbhaya lawyer seema kushwaha will fight hathras rape victim case
Updated on

लखनौ (उत्तर प्रदेश): देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयात पीडितेची बाजू मांडणाऱ्या विधीज्ञ सीमा कुशवाहा या हाथरस बलात्कार पीडितेचा खटला लढणार आहेत. त्यासाठी त्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. पण, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू दिले नाही.

सीमा कुशवाहा म्हणाल्या, 'पीडितेच्या कुटुबियांनीच मला त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडण्याची विनंती केली आहे. परंतु, येथील प्रशासन मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही. पीडित युवतीच्या भावाच्या संपर्कात असून, त्यांच्या कुटुबियांना भेटल्याशिवाय परतणार नाही.' सीमा कुशवाहा यांनी निर्भया बलात्कार खटल्यात निर्भयाच्या कुटुंबाची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या वर्षी 20 मार्च रोजी चारही आरोपींना फाशी देण्यात आली. सीमा कुशवाहा आता हाथरसमधील बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात बाजू मांडणार आहेत. पण, उत्तर प्रदेशमधील प्रशसन त्यांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात राहणारी युवती 14 सप्टेंबर रोजी शेतात काम करत होती. यावेळी चार जणांनी तिला खेचत बाजूला नेले आणि अत्याचार केला. युवतीच्या पाठीचा मणका मोडला. शिवाय, बोलता येऊ नये म्हणून जीभ कापली. यानंतर ओढणीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. आई आणि भावाने शोधाशोध केल्यावर ती शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यनंतर पोलिसांनी तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()