Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्यांवरून विरोधक होऊ शकतात आक्रमक

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन ‘एनडीए’ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडतील
Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्यांवरून  विरोधक  होऊ शकतात आक्रमक
Updated on

New Delhi: संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उद्या (ता. २१) केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ‘एनडीए’ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (ता. २३) मांडतील.

दरम्यान, महाराष्ट्र, हरियाना, झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हे अधिवेशन होत असल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. नीट परीक्षा, यूपीएससीचा गोंधळ , उत्तरप्रदेशातील कावड यात्रेमुळे निर्माण झालेला वाद हे मुद्दे या अधिवेशनात गाजू शकतात.

Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्यांवरून  विरोधक  होऊ शकतात आक्रमक
Nirmala Sitharaman: "मुंबई सारखं नाही! बेंगळुरूमधील उद्योजक खूप सभ्य अन् शांत" अर्थमंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ

संसदेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान होणार असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सरकारतर्फे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी उद्या (ता. २१) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीस संसदेतील सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित राहणार असून अधिवेशनात उपस्थित करावयाच्या मुद्द्यांवर यात चर्चा होईल.

Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्यांवरून  विरोधक  होऊ शकतात आक्रमक
Nirmala Sitharaman : फिनटेक कंपन्यांना नियमपालनाची सूचना ; केंद्रीय अर्थमंत्र्यांची ५० कंपन्यांच्या वरिष्ठांशी चर्चा

या अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. याशिवाय सरकारने सहा नवी विधेयके या अधिवेशनात आणण्याचे ठरविले आहेत. विरोधी पक्षांनी महागाई, बेरोजगारी, कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्न, सीमेवर चीनची दादागिरी, जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटना यासारख्या मुद्द्यांसोबतच वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटवरून झालेला गोंधळ, महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण तसेच यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा, उत्तर प्रदेशात कावड यात्रेच्या मार्गावर दुकानदारांना आपले नाव ठळकपणे लिहिण्याचे प्रशासनातर्फे जारी झालेले आदेश आदी मुद्यांवर विरोधक आक्रमक होऊ शकतात.

Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्यांवरून  विरोधक  होऊ शकतात आक्रमक
Nirmala Sitharaman Budget Speech: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे फास्टट्रॅक अर्थसंकल्प; चक्क तासाभरातच उरकलं भाषण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com