केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आठवड्यात युनायटेड स्टेट्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारताच्या भूगोलाच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांबद्दल चर्चा केली. त्या म्हणाल्या "मित्र कमकुवत असू शकत नाही" यावर जोर दिला. "तुम्ही तुमचा मित्र निवडू शकता पण तुमचा शेजारी नाही," असे देखील अर्थमंत्री म्हणाल्या. या दरम्यान आर्थिक निर्बंध घालण्यात आलेल्या रशियाकडून भारताने शस्त्रास्त्रे आणि तेल खरेदी करण्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
युक्रेन युद्धामुळे जागतिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाकडून भारताने शस्त्रे आणि तेल खरेदी करण्याशी संबंधित पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, "भारताकडे स्थलांतर करण्याचा पर्याय नाही" आणि त्यानुसार, देशाला योग्य भूमिका घ्यावी लागेल" असे अर्थमंत्री म्हणाल्या
एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये, एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले खी "अमेरिकेसोबतचे संबंध चांगले झाले आहेत… तो एक मित्र आहे असे माणले जाते, पण मित्राचे भौगोलिक स्थान समजून घ्यावे लागेल आणि मित्राला कोणत्याही कारणाने कमकुवत करता येत नाही. आपल्याला भौगोलिक स्थान लक्षात घेतले पाहिजे. उत्तर सीमा तणावात आहेत…पश्चिम सीमा विषम आहेत…आणि तेथे अफगाणिस्तान आहे. आणि असे नाही की भारताकडे स्थलांतर करण्याचा पर्याय आहे."
माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करून निर्मला सीतारामन म्हणाल्या, "तुम्ही तुमचा शेजारी निवडू शकत नाही... तुम्ही तुमचा मित्र निवडू शकता. तुमचा शेजारी तोच आहे जो तुमच्याजवळ आहे. जर अमेरिकेला मित्र हवा आहे, पण त्यांना कमकुवत मित्र नको असेल. म्हणून आम्ही निर्णय घेत आहोत कारण भौगोलिक स्थान पाहता, आपण कुठे आहोत हे माहित असणे आवश्यक आहे."
निर्मला सीतारामन म्हणाल्या, "अमेरिकेसोबतचे भारताचे संबंध खरोखरच प्रगती करत आहेत. ते अधिक घट्ट झाले आहेत. यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. पण असाही एक समज आहे की, केवळ संरक्षण उपकरणांसाठी रशियावरच भारत अवलंबून नाही. भारत आणि रशियाचे संबंधही अनेक दशकांपूर्वीचे आहेत. काही सांगायचे असेलच तर, मी विश्वासाने सांगू शकते की तो सकारात्मक समज आहे. नकारात्मक समज नाही''
रशियावरील उर्जा अवलंबित्व हा एक मुद्दा जो युक्रेन युध्दादरम्यान पश्चिमात्य देशांकडून सतत उपस्थित केला जात आहे, यावर बोलताना सितारमन म्हणाल्या की. "आमच्या एनर्जी बास्केटमध्ये जे मुख्यत्वे मध्य पूर्व, काहीसे यूएस मधून आहे… रशियन फेडरेशनकडून येणारा भाग इतका नाही की तो आम्हाला अस्वस्थ करेल. रशियातून येणारा क्रूडचा हिस्सा 3-4 टक्के यापेक्षा जास्त नाही."
24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युक्रेनमधील युद्धाने भारतासमोरही आव्हाने उभी केली आहेत, असे त्या म्हणाल्या. "युक्रेन युद्धाचे काही पैलू आव्हानात्मक आहेत- सूर्यफूल तेलाचा पुरवठा जो मुख्यत्वे युक्रेनमधून येतो तो आता होत नाही… आम्ही पर्याय शोधत आहोत. निर्बंधांमुळे, रशियाकडून आवश्यक खतांचा (पुरवठा) करणे कठीण होणार आहे. "
या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, WTO ने परवानगी दिल्यास भारत जगाला अन्नधान्याचा पुरवठा करू शकतो. सीतारामन यांनी शुक्रवारीही त्याची पुनरावृत्ती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.