मनमोहन सिंग यांच्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या

पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का?
मनमोहन सिंग यांच्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या
Updated on

पंजाब: पंजाब निवडणूकीची (Punjab Election 2022) रणधुमाळी सुरु असतानाच काल माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांनी भाजपवर (BJP) टीका केली. भाजपचं राष्ट्रीयत्व ब्रिटिशांच्या 'फोडा आणि राज्य करा' या तत्वाचं आहे. यामुळे घटनात्मक संस्था कमकुवत होत आहेत अशी टीका मनमोहन सिंग यांनी काल पंजाबमध्ये केली. याचा व्हिडिओही काल व्हायरल झाला. यावर केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अर्थव्यवस्थेवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीकास्त्र सोडले.यावरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का? असा प्रश्न निर्मला सीतारामन यांनी उपस्थित केला.

Summary

मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

मनमोहन सिंग यांच्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या
भाजपचं राष्ट्रीयत्व ब्रिटिशांच्या 'फोडा आणि राज्य करा' तत्वाचं - मनमोहन सिंग

पुढे त्या म्हणाल्या, मनमोहन सिंग यांना भारताला सर्वात कमकुवत बनवल्याबद्दल आणि देशातील महागाई वाढवल्याबद्दल ओळखले जाते अश्या मिश्किल शब्दात शालूजोडे हाणले.

काय म्हणाले मनमोहन सिंग

राजकारण्यांना मिठी मारून, किंवा आमंत्रण न देता बिर्याणी खायला गेल्याने नाती सुधारत नाहीत उलट यामुळे घटनात्मक संस्था कमकुवत होत आहेत. भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील सरकारला आर्थिक धोरणाचे आकलन नाही. हा प्रश्न केवळ राष्ट्रापुरता मर्यादित नाही. हे सरकार परराष्ट्र धोरणातही अपयशी ठरले आहे. चीन आमच्या सीमेवर बसला आहे आणि त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()