Union Budget 2023 News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (बुधवार) मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प २.० सादर केला. भाषणादरम्यान एका प्रसंगी अर्थमंत्र्यांची जीभ घसरली, त्यावरून संसदेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.
जुन्या polluting vehicles (प्रदूषण करणारी वाहने) बदलणे हे आमचं धोरण आहे असं वाक्य म्हणताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन चुकून replacement of old political असं म्हणाल्या. त्यावरून सभागृहात जोरदार हशा.
त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी शब्द सावरून घेतला आणि अर्थात हेही लागू होतं असं म्हणत स्मितहास्य केलं. अर्थमंत्री जुन्या वाहनांच्या धोरणाबाबत सरकारची योजना सांगत होत्या.
यादरम्यान, 'जुने वाहने बदलणे', या वाक्याऐवजी त्या 'जुने राजकीय बदलणे' म्हणजेच (जुने राजकारण काढून टाकणे) बोलले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.