Nithari killing: निठारी हत्याकांडप्रकरणी सुरिंदर कोळी, मोनिंदर सिंह पंढेर निर्दोष; फाशी देखील रद्द

निठारी हत्याकांडप्रकरणातील हे दोघेही प्रमुख संशयीत आरोपी आहेत.
nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
Updated on

Nithari killing : Nithari killing: सन २००५-२००६ मधील नोयडा इथल्या सिरियल मर्डर केस अर्थात निठारी हत्याकांडप्रकरणी प्रमुख संशयीत आरोपी सुरिंदर कोळी आणि मोनिंदर सिंह पंढेर या दोघांना अलाहाबाद हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. कोर्टानं दोघांना निर्दोष ठरवलं असून त्यांची फाशीची शिक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. (Nithari killings accused Surendra Koli Pandher acquitted death penalty cancelled)

इतिहासातील सर्वात अमानुष कृत्य

भारताच्या इतिहासातील आलिकडच्या काळातील निठारी हत्याकांड प्रकरण हे खूपच भयानक असं गुन्हेगारी प्रकरण आहे. यामध्ये सुरिंदर कोळी याच्यावर आरोप आहे की, अमानुषपणे बालकांना ठार करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे नोयडातील निठारी इथं मोनिंदर सिंह पंढेर याच्या घराच्या आवारात पुरले होते. सन २००६ मध्ये समोर आलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. (Latest Marathi News)

nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
Israel Hamas War : सहा वर्षीय चिमुकल्यावर चाकूने २६ वेळा वार; इस्त्राइल-हमास युद्धातील हेटक्राईमच्या झळा अमेरिकेतही

दोषी आणि फाशी

या प्रकरणांबाबत माहिती देताना अॅड. मनिषा भंडारी म्हणाल्या, दोन प्रकरणांबाबत हायकोर्टात अपिल करण्यात आलं होतं. या दोन्ही प्रकरणांमध्ये सेशन्स कोर्टाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या प्रकरणात मनिंदर सिंह पंढेरला हायकोर्टानं निर्दोष मुक्त केलं आहे. तसेच सुरिंदर कोळी याला देखील जेव्हा अपिल आल्या होत्या त्या सर्वांमधून दोषमुक्त करण्यात आलं. कोळीच्याबाबतीत १४ केसेसमध्ये अपिल करण्यात आलं होतं.

या सर्व केसेसमधून त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. तर पंढेरच्याविरोधात केवळ दोन केसेस होत्या त्यातून त्याला मुक्त करण्यात आलं. सेशन्स कोर्टाचा जो निकाल होता तो बदलून या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मनिंदर सिंह पंढेरवर एकूण ६ केसेस होत्या, त्यातील एकामधून आधीच दोषमुक्त केलं होतं. बाकी तीन प्रकरणातून सेशन्स कोर्टानं मुक्त केलं होतं. उरलेल्या दोन होत्या त्यात त्याला फाशी झाली होती त्यातून आता दोषमुक्ती मिळाली आहे.

nithari case search for a sandal lead to secret of 19 murders exposed noida
PM Modi On Amitabh Bhachchan: कुछ दिन तो गुजारो.. बिग बींना पंतप्रधानांच खास आमंत्रण !

दोघेही तुरुंगातून बाहेर येणार?

यांपैकी पंढेर आता तुरुंगातून बाहेर येईल, पण केळीबाबत एक खटला सुप्रीम कोर्टात पेंडिंग असल्यानं अद्याप त्याच्या तुरुंगातून बाहेर येण्याबाबत शंका आहे, अशी माहिती देखील अॅड. मनिषा भंडारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.