नवी दिल्ली : आता वाहनात बसलेल्या सर्व प्रवाशांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. आता कारमध्ये बसलेल्या सर्वच लोकांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले आहेत.
सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर, आज सरकारने बॅकसीट प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता कारच्या मागच्या सीटसाठी देखील सीट बेल्ट आवश्यक आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. एका मीडिया इव्हेंटला संबोधित करताना ते म्हणाले, सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यामुळे, आम्ही निर्णय घेतला आहे की वाहनांमध्येही मागील सीटसाठी सीटबेल्ट बीप सिस्टम असेल, असे त्यांनी सांगितले.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या भीषण रस्ता अपघातानंतर, तज्ञ आणि समीक्षकांनी वाहतूक आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधले होते. कार प्रवाशांसाठी सीटबेल्टचे नियमन करणार्या कायद्यांबाबत चर्चा सुरू ढाली होती. त्यानंतर नितीन गडकरी यांनी कारमधील सर्व प्रवाशांसाठी सर्व सीटबेल्ट अनिवार्य आहेत असे म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन करणा-यांना दंडाची शिक्षा होईल, असे देखील गडकरी म्हणाले.
सीट बेल्ट न लावल्याबद्दल चालान (दंडात्मक दंड) परवानगी दिली जाईल. आदेशाची अंमलबजावणी 3 दिवसांच्या आत केली जाईल, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री गुजरातहून महाराष्ट्रात जात असताना पालघर जिल्ह्यात हा अपघात झाला.
सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनाहिता पांडोळे आणि दारियस पांडोळे हे दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर अनाहिता पांडोळे कार चालवत होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. या अपघातात पुढच्या सीटवरील एअरबॅग्ज निघाल्या होत्या परंतु मागील सीटवरील एअरबॅग बाहेर पडल्या नाहीत असेही पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.