कर्नाटकासह देशात अमेरिकासारखे होणार रस्ते; नितीन गडकरींचा संकल्प

रिंगरोडच्या कामाला लवकरच सुरवात; 5 राष्ट्रीय महामार्गांना चालना
 Nitin Gadkari
Nitin GadkariEsakal
Updated on

बेळगाव : बेळगावातील (Belguam) रिंगरोड प्रस्तावाला अगोदरच मंजूरी देण्यात आली आहे. पण, त्यासाठी आवश्‍यक भूसंपादन आणि इतर बाबींची पुर्तता राज्य सरकारतर्फे होणे अपेक्षित आहे. ते मिळताच बेळगावात रिंगरोडच्या कामाला सुरवात केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी केली. तसेच २०२४ अखेरपर्यंत कर्नाटकासह (Karnataka) देशामधील रस्त्यांच्या विकास अमेरिकाच्या (America) धर्तीवर करण्याचा संकल्प केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

 Nitin Gadkari
Maratha Reservation : लढाईत बहुजनांचा पाठिंबा; संभाजीराजेंनी मानले आभार

जिल्ह्यामध्ये ३,९७२ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या २३८ कि.मी. लांबीच्या ५ राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज (ता. २८) चालना देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा क्रीडांगणावरील कार्यक्रमाला केंद्रीय खाण व संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai), सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, पालकमंत्री गोविंद कारजोळ (Govind Karjol) , महिला आणि बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले (Shashikala Jolle), वनमंत्री उमेश कत्ती, खासदार मंगल अंगडी आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते.

Summary

कर्नाटकासह देशामधील रस्त्यांच्या विकास अमेरिकाच्या धर्तीवर करण्याचा संकल्प.

मंत्री गडकरी म्हणाले,‘‘रिंगरोडबाबत मुख्यमंत्री, खासदार, आमदारांनी निवेदन दिले आहे. पण, बेळगावचा रिंगरोड अगोदरच मंजूर आहे. मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडल्यास रिंगरोड कामाला सुरवात केली जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात अतिरिक्त १६०० कोटी मिळाले आहेत. हा निधी सेतू भारतम योजनेखाली दहा हजार कोटीचे रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) देशात उभारण्यात येतील. यात बेळगाव जिल्ह्यातील १२ रेल्वे उड्डाण पुलांचा यात समावेश आहे. बेळगाव-संकेश्‍वर सहापदरी रस्ता खूप महत्वाचा आहे. अनेक वर्षापासून उपयुक्तता व्यक्त केली जात होती. गोल्डन कॉरीडोअर भाग आहे. दुसऱ्या टप्प्यात संकेश्‍वर ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत सहापदरी रस्ता करण्यात येणार आहे. कर्नाटक-गोवा दुपरीकरणाला चालना मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असून, यंदा ते पूर्ण होईल.’’

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावातील रिंगरोडसाठी आवश्‍यक भूसंपादनासह सर्व सहकार्य मिळेल. तसेच या कामांसाठी आवश्‍यक सवलती दिल्या जातील. जलशक्ती रस्त्यांची निर्मिती राज्यात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाषण झाले. सार्वजनिक बाधकाम मंत्री सी. सी. पाटील यांनी प्रास्तावीक केले.

महाराष्ट्र-कर्नाटक जलतंटा मिटविण्यास अपयश

पाणी वाटपावरून देशातील विविध राज्यात वीस स्वरुपाचे मतभेद होते. त्यापैकी १३ प्रश्‍न सोडविले. बैठकीपूर्वी दरवाजा बंद करून चर्चेला सुरवात व्हायची. जोपर्यंत तोडगा निघत नव्हता. तोपर्यंत दरवाजा उघडला जात नव्हता. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आदी राज्यातील पाणी प्रश्‍न मिटले. परंतु, महाराष्ट्र व कर्नाटक पाणी प्रश्‍न सोडविणे शक्य झाले नाही. या राज्यांचे प्रश्ही‍न सुटले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

-शेतकऱ्यांचे टोल आकरणी नाही

-जिल्ह्यात १२ रेल्वे उड्डाण पूल

-बेळगाव-खानापूर चारपदरी रस्ता (६० टक्के काम पूर्ण)

-देशात ग्रीन फिल्ड हायवेची निर्मिती

-राष्ट्रीय महामार्ग शेजारी स्मार्ट व्हिलेज तयार करा

-२०२३ मध्ये बंगळूर-चेन्नई रस्त्याचे उद्‍घाटन

-बंगळूरचा रिंगरोड २०२४ पर्यंत पूर्ण करणार

-पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती (भारतमाला योजना)

-दिवंगत केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे स्मरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.