Internal Conflict In BJP: "पंतप्रधानांविरुद्ध अंतर्गत असंतोष..." गडकरींच्या 'त्या' पत्राचा हवाला देत माजी मंत्र्याचा दावा

Nitin Gadkari Letter: उत्तर प्रदेशाच्या या निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अदित्यनाथांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
PM Narendra Modi And Nitin Gadkari
PM Narendra Modi And Nitin GadkariEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे काही नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आलबेल नसल्याच्या आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाल्याच्या चर्चा असतात. अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना पत्र लिहित जीवन आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर लावलेला 18 टक्के जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती.

यानंतर गडकरींच्या पत्राचा हावाला देत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी मोठा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पक्षात असंतोष असल्याचे म्हटले आहे.

जयराम रमेश यांनी नुकतेच एक्सवर दोन ओळींची एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये रमेश यांनी म्हटले की, "नितीन जयराम गडकरी यांनी अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांविरुद्ध अंतर्गत असंतोष आणि गोंधळाचे लक्षण आहे."

काय होते गडकरींच्या पत्रात?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी जीवन आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर लावलेला 18 टक्के जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे.

28 जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की, या प्रीमियमवर कर लादणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लादण्यासारखे आहे. हा कर विमा क्षेत्राच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi And Nitin Gadkari
Banks Ransomware Attack: 300 पेक्षा जास्त बँकांच्या सर्व्हरमध्ये शिरला व्हायरस; UPI पेमेंट बंद, तुम्ही तपासलं का?

योगी अदित्यनाथ मोदी-शाहांवर नाराज?

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जबरदस्त झटका बसला होता. यामध्ये गेल्या निवडणुकीत 80 पैकी 62 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा फक्त 36 जागा मिळाल्या.

उत्तर प्रदेशात झालेल्या या घसरणीमुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांची मर्जी राखावी लागली. तसेच हे सरकार सुरळीत चालावे म्हणून मित्र पक्षांना पूर्ण पाच वर्षे सांभाळावे लागणार आहे.

PM Narendra Modi And Nitin Gadkari
Renukaswamy Murder Case: "गरीब असो की श्रीमंत, पौष्टिक आहार मिळणे हा कैद्यांचा हक्क", चाहत्याची हत्या करणाऱ्या अभिनेत्याला दिलासा

उत्तर प्रदेशाच्या या निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अदित्यनाथांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे नुकतेच एका बैठकीत समोरा समोर आल्यानंतरही मोदी-शहा यांना अदित्यनाथांनी पाहण्याचे टाळत नमस्कारही केला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.