गेल्या दोन महिन्यांत देशभरात इलेक्ट्रिक स्कूटर्सनी पेट घेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत हे लक्षात घेऊन, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले, तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या गुणवत्तेबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील, त्यासोबतच निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असेही केंद्रिय मंत्री गडकरी यांनी सांगितले.
गडकरी यांनी ट्विट करत, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे, असे म्हटले आहे.
तसेच त्यांनी या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजनांंच्या शिफारसी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे, संबंधीत वाहन कंपन्यांना आवश्यक आदेश जारी केले जातील. तसेच सरकार लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी केले जातील असे गडकरी यांनी सांगितले.
या काही दिवसांपूर्वी ओला ई-स्कूटरने पेट घेतल्याचा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाला होता, त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. यानंतर या अपघातांची सरकारकडून चौकशी केली जात आहे. स्टार्टअप प्युअर ईव्हीच्या स्कूटरलाही आग लागली आणि ओकिनावा ऑटोटेकच्या स्कूटर सोबत झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. कंपन्यांचे म्हणणे आहे की, ते या घटनेची चौकशी करत आहेत.
यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मीतीच्या बाबतीत "कोणत्याही कंपनीने त्यांच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास, मोठा दंड ठोठावला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेशही दिले जातील" असे देखील त्यांनी सांगितले
दरम्यान, "कंपन्या वाहनांच्या सर्व दोषपूर्ण बॅच ताबडतोब परत मागवण्यासाठी आगाऊ कारवाई करू शकतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे", असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.