Ratan Tata: इतके मोठे उद्योगपती पण... नितीन गडकरींनी सांगितली रतन टाटांची एक आठवण, नेमकं काय म्हणाले?

Nitin Gadkari On Ratan Tata: रतन टाटा यांच्यासोबतची नितीन गडकरींनी एक आठवणी सांगितली आहे. तसेच त्यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. यात टाटांचा साधेपणा दिसून आला आहे.
Nitin Gadkari On Ratan Tata
Nitin Gadkari On Ratan TataESakal
Updated on

Nitin Gadkari On Ratan Tata: भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आता आपल्यात नाहीत. रतन टाटा यांनी नेहमीच आपल्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली आहेत. रतन टाटा त्यांच्या कर्तृत्वासोबतच त्यांच्या नम्र स्वभावासाठी आणि परोपकारी कार्यासाठीही ओळखले जात होते. म्हणूनच त्यांच्या मृत्यूच्या दिवशी सर्व स्तरातील लोक त्यांच्या साधेपणाच्या आठवणी शेअर करत आहेत. रतन टाटा यांच्या साधेपणाशी संबंधित एक रंजक किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता, तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रतन टाटा यांच्याबद्दल बोलताना नितीन गडकरींनी सांगितले होते की, 'रतन टाटाजी माझे चांगले मित्र आहेत. एकदा ते मुंबईतील मलबार हिल येथील माझ्या घरी येत होते. त्यावेळी ते माझ्या घराचा रस्ता विसरले. त्यांनी मला फोन करून सांगितले, नितीन, मी तुमच्या घराचा रस्ता विसरलो आहे. मग मी म्हणालो फोन ड्रायव्हरला द्या. यावर रतन टाटा म्हणाले की, माझ्याकडे चालक नाही, मी स्वतः गाडी चालवत आहे. यानंतर मी आश्चर्याने विचारले की तुमच्याकडे खरच ड्रायव्हर नाही, तर ते म्हणाले नितीन नाही, मी स्वतः गाडी चालवतो. मग मी त्यांना मार्ग सांगितला. त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटले की देशाचा एवढा मोठा करोडपती असूनही त्यांच्याकडे ना ड्रायव्हर आहे ना सुरक्षारक्षक.

Nitin Gadkari On Ratan Tata
Ratan Tata TCS: जागतिक संकटाचं केलं सोनं अन् रतन टाटांची लाडकी टीसीएस नंबर 1 कंपनी बनली! काय होता 'वाय-टू-के' प्रॉब्लेम?

नितीन गडकरी म्हणाले, एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मी त्यांना मुंबईला घेऊन जात होतो. त्यावेळी ते हेलिकॉप्टर चालवत होते. त्यांचा स्वभाव पाहता ते टाटा समूहाचे मालक आहेत असे त्यांना कधीच वाटले नाही. गडकरींनी रतन टाटा यांच्याबद्दल आणखी काही किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, एकदा मी आणि रतनजी नागपूरला जात होतो. त्याच्याकडे एक छोटी बॅग होती. यावर मी एका स्टाफ सदस्याला रतनजींकडून बॅग घेण्यास सांगितले. त्यावर रतन टाटा म्हणाले की, ही बॅग माझी आहे, मी ही घेऊन जाईन.

टाटा समुहाने बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या निधनाची माहिती शेअर केली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. टाटा समूह 2023-24 मध्ये 13 लाख 85 हजार कोटी रुपयांच्या कमाईसह जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक आहे. रतन टाटा यांनी 20 वर्षांहून अधिक काळ टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले. निवृत्तीनंतरही ते टाटा समूहाला मार्गदर्शन करत राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.