''बापाचा हात डोक्यावर असेल तर भीतीचं कारण नाही''

baba ramdev and pm modi
baba ramdev and pm modie sakal
Updated on
Summary

आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी रामदेव बाबा आणि मोदींवर एक कार्टून शेअर करत टीका केली आहे.

नागपूर : योग गुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)चा वाद थांबवण्याचं नावच घेत नाही. बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी (Allopathy)उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आक्रमक झाली. तसेच बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. त्यावरूनच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी रामदेव बाबा आणि मोदींवर एक कार्टून शेअर करत टीका केली आहे. (nitin raut criticized pm modi on baba ramdeo case)

baba ramdev and pm modi
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी जनगणना पर्याय?

डोक्यावर जेव्हा बापाचा हात असतो तेव्हा भीतीचे कारण नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. कार्टूनमध्ये डॉक्टर पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांना यांना तर माझा बाप पण अटक करू शकत नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तेच कार्टून नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटरवर शेअर करत मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ज्या देशात रघुराम राजन आणि अबिजित बॅनर्जी यांना नक्षलवादी ठरविलं जातं, तिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, असा घणाघात देखील त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. या सर्व गोष्टींमुळे देशाचा जीडीपी वजा ७.३ गेला असल्याचा आरोपही राऊतांनी केला.

नेमकं काय आहे प्रकरण? -

सोशल मीडियामध्ये बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधात बोलताना दिसले. कोविड-१९ महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत, असं ते म्हणाले होते.

बाबा रामदेव यांच्या या वक्तव्याची गंभीर देखल IMA नं घेतली. याबाबत एक प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये कथीत व्हिडिओत बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या आरोपांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्विकार करावा आणि देशातील या आधुनिक चिकित्सापद्धतीचा भंग करावा किंवा बाबा रामदेव यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तसेच IMA ने मानहाणीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत बाबा रामदेव यांना सुनावलं आहे. (nitin raut criticized pm modi on baba ramdeo case)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.