बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी पाटणा येथील सचिवालयात सुमारे अर्धा तास भेट घेतली. आता याबाबत बिहारसह देशभरातील राजकारणात उहापोह सुरू झाला आहे. अशा स्थितीत बिहारमध्ये पुन्हा काही मोठा खेळ होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिहार पुन्हा देशाच्या राजकारणाचे केंद्र बनणार आहे का? हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी तब्बल आठ महिन्यांनी एकमेकांना भेटल्याने हे प्रश्न उपस्थित होत आहेत.