Nitish Kumar: बिहारमध्ये बाजीगर कोण? भाजपशिवाय नितीश कुमारांचं भवितव्य शून्य, आकडेवारी काय सांगते?

नितीश कुमार यांच्यामुळे इंडिया आघाडीला मोठा फटका बसला आगे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी पलटी मारली आणि एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
Nitish Kumar bihar News in Marathi- Election statistics of BJP-JDU-Lok Sabha and Assembly Elections-Bihar Latest News
Nitish Kumar bihar News in Marathi- Election statistics of BJP-JDU-Lok Sabha and Assembly Elections-Bihar Latest News
Updated on

Nitish Kumar News in Marathi

नितीश कुमार यांच्यामुळे इंडिया आघाडीला मोठा फटका बसला आगे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी पलटी मारली आणि एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. इंडिया आघाडीला बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण लोकसभा आणि विधानसभेत भाजप-जेडीयूचं वर्चस्व आहे.

नितीश कुमार हे देशाच्या राजकारणात मुरलेले राजकारणी आहे. जेव्हा-जेव्हा त्यांनी पलटी मारली तेव्हा त्यांना भाजपसोबत युतीचा फायदा झाला आहे. आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते. बिहार विधानसभेचं संख्याबळ २४३ आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे ४५ सदस्य आहेत तर भाजपकडे ७८ सदस्य आहेत. यामुळे युतीचं संख्याबळ १२३ झालं. तर महाआघाडीजवळ एकून ११४ आमदार आहेत. तर सरकार स्थापन करण्यासाठी १२२ सदस्यांची संख्या आवश्यक आहे. महाआघाडीला सत्ता स्थापनेसाठी ८ सदस्यांची गरज आहे.

२०१९ ची आकडेवारी -

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजप, जेडीयू आणि लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) यांचा समावेश होता. राज्यातील ४० लोकसभा जागांपैकी भाजप आणि जेडीयूने १७ जागांवर आणि एलजेपीने सहा जागांवर निवडणूक लढवली. युतीने ४० पैकी ३० जागा जिंकल्या होत्या, भाजप आणि एलजेपीने त्यांनी लढवलेल्या सर्व जागा जिंकल्या, तर जेडीयूला १ जागा कमी मिळाली जी काँग्रेसने जिंकली होती. (nitish kumar News in Marathi)

काँग्रेस आणि इतर तीन लहान पक्षांचा समावेश असलेल्या आरजेडीच्या नेतृत्वाखालील आघाडीसाठी हा मोठा संघर्ष होता. ३१.२३ टक्के मते मिळवूनही, त्यांनी एकत्रितपणे फक्त १ जागा जिंकली. काँग्रेसने ९ जागांवर निवडणूक लढवली आणि १ जागा जिंकली, तर आरजेडीने १९ जागांवर निवडणूक लढवली आणि एकही जागा जिंकली नाही.

Nitish Kumar bihar News in Marathi- Election statistics of BJP-JDU-Lok Sabha and Assembly Elections-Bihar Latest News
Nitish Kumar : नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाची यादी आली समोर; आज शपथ घेणाऱ्यांमध्ये 'यांचा' समावेश

डाव्या पक्षांनी लढवलेल्या १९ जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. उल्लेखनीय म्हणजे, आरडेडीला १५.६८ टक्के मते मिळूनही शून्य जागा मिळाल्या, तर भाजपला २४.०६ टक्के आणि जेडीयूला २२.२६ टक्के मिळाले. (Latest Marathi News)

२०१४ मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट होती. यावेळी जेडीयूने स्वबळावर ३८ जागा लढवल्या होत्या. परंतु त्यांना फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी भाजप एलजेपी आणि अन्य प्रादेशिक पक्षाचा समावेश असलेल्या एनडीएने ३१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपशिवाय नितीश कुमार यांच भवितव्य शून्य आहे. हे आकडेवारीवरुन स्पष्ट होतं. २०१४ मध्ये आरडेजी-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फक्त ७ जागा मिळाल्या होत्या.

Nitish Kumar bihar News in Marathi- Election statistics of BJP-JDU-Lok Sabha and Assembly Elections-Bihar Latest News
Nitish Kumar: मोदींसोबत जेवण अन् इंडिया आघाडीतील स्वप्न भंगलं, नितीश कुमार पुन्हा एनडीएकडे का गेले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.