Nitish Kumar : 'JDU चे आमदार फोडण्यासाठी दहा-दहा कोटींची ऑफर', तेजस्वी यादवांच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

बिहारमध्ये सोमवारी नितीश कुमार सरकारने बहुमत चाचणी जिंकली आहे. जेडीयूचे आमदार सुधांशु शेखर यांनी पोलिसात एक केस दाखल केली असून आरजेडीकडून आमदार फोडण्यासाठी दहा-दहा कोटी रुपयांची ऑफर दिल्याचं म्हटलं आहे.
Nitish Kumar
Nitish Kumaresakal
Updated on

Bihar Politics : बिहारमध्ये सोमवारी नितीश कुमार सरकारने बहुमत चाचणी जिंकली आहे. जेडीयूचे आमदार सुधांशु शेखर यांनी पोलिसात एक केस दाखल केली असून आरजेडीकडून आमदार फोडण्यासाठी दहा-दहा कोटी रुपयांची ऑफर दिल्याचं म्हटलं आहे.

बहुमत चाचणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल (युनायटेड) आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 122 आमदारांची आवश्यकता होती. नितीश कुमार यांना 129 आमदारांचे समर्थन मिळाले आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. बहुमत चाचणीपूर्वी विधीमंडळात केलेल्या भाषणामध्ये नितीश कुमारांनी आमदार फोडाफोडीचा आरोप केला होता.

Nitish Kumar
Ashok Chavan Friendship : अशोक चव्हाणांचा कॉलेजमध्ये राडा झाला अन् भांडण मिटवायला पोहचले महेश मांजरेकर

आता त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट येत असून जेडीयूचे आमदार सुधांशु शेखर यांनी पोलिस ठाण्यात प्रकरण दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेडीयूचे आमदार फोडण्यासाठी सुरुवातील पाच-पाच कोटी रुपये देणार होते. नंतर उर्वरित पाच कोटी रुपये मिळणार होते. तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय इंजिनियर सुनील यांच्यावतीने ही ऑफर दिल्याचा आरोप आहे. तसेच माजी मंत्री नागमणी कुशवाहा यांनी माहिती दिली होती की, अखिलेश तुमच्यासोबत बोलतील. इंटरनेट कॉलद्वारे कुण्या अखिलेश नावाच्या व्यक्तीने कॉल केला आणि स्वतःला राहुल गांधींच्या जवळचा असल्याचं सांगितल्याचं सुधांशु शेखर यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय तक्रारीमध्ये असंही म्हटलंय की, जेडीयूच्या आमदारांना पैशांसोबत मंत्रीपदांचीही ऑफर दिली होती. आपल्यासह अनेक आमदारांना अशा ऑफर आसल्याचं सुधांशु यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे फ्लोअर टेस्टमध्ये पास झाल्यानंतर अशा पद्धतीने फुटण्यासाठी तयार असलेल्या आमदारांवर जेडीयू कडक कारवाई करणार आहे.

पाटण्याच्या कोतवाली ठाण्यात तेजस्वी यादव यांच्या जवळचे ठेकेदार सुनील यांच्यावर अपहरणाची केस दाखल करण्यात आलेली आहे. जेडीयू आमदार बीमा भारती आणि दिलीप राय यांच्या अपहरणाची केस दाखल करण्यात आलीय.

Nitish Kumar
Farmers Protest : दिल्लीकडे कूच करणार 200 शेतकरी संघटना! प्रशासन अलर्ट मोडवर; कलम 144, ट्रॅफिक अ‍ॅडव्हायजरी जारी

तेजस्वी यादव यांचा गंभीर आरोप

बहुमत प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर टीका केली. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळाला याबाबत मी आनंदी आहे. पण, भाजपने त्यांना भारतरत्न देऊन डील केली आहे. तुम्ही आमच्या सोबत या, तुम्हाला भारतरत्न देतो.. अशी ती डील होती, असा आरोप यादव यांनी विधानसभेत बोलताना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.