Nitish Kumar: मोदींसोबत जेवण अन् इंडिया आघाडीतील स्वप्न भंगलं, नितीश कुमार पुन्हा एनडीएकडे का गेले?

Nitish Kumar: देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूंकप झाला आहे. यावेळी भूंकपाचे केंद्रबिंदू आहे बिहार, बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते पुन्हा एनडीए सोबत संसार थाटणार आहेत.
Nitish Kumar News In Marathi
Nitish Kumar News In Marathi
Updated on

Nitish Kumar News In Marathi

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूंकप झाला आहे. यावेळी भूंकपाचे केंद्रबिंदू आहे बिहार, बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते पुन्हा एनडीए सोबत संसार थाटणार आहेत. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडी देखील बॅकफूटवर आली आहे. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल(RJD) सोबत काडीमोड का घेतली, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. हा राजकीय भूंकप होताना नेमकी काय प्रोसेस झाली हे जाणून घेऊ.

२५ मार्च २०२२ ला लखनऊमध्ये योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळा होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नितीश कुमार देखील हजर होते.  ते खूप खुश होते. मात्र ९ ऑगस्ट २०२२ ला त्यांनी अचानक एनडीए सोबत नातं तोडलं. त्यानंतर ते १३ महिने भाजप नेत्यांपासून दूर होते.

इंडिया आघाडीची १३ जानेवारीची बैठकी काय झालं?

मात्र एक दिवस आला एनडीए पासून दुर झाल्यानंतर नितीश कुमार यांनी १३ महिन्यांनतर दिल्लीत जी-२० मेजवानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नितीश यांचे एनडीएकडे जाण्याचं ते पहिल पाऊल होतं, असं मानल्या जात आहे. यावेळी ते २८ तास दिल्लीत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या त्यावेळी चर्चा झाली होती.

नितीश कुमार हे देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत होते. त्यासाठी त्यांनी इंडिया घाडीत देखील मोठी जबाबदारी घेतली होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची भेट घेत मोर्चेबांधणी सुरु केली होती. कारण एनडीए सोबत त्यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नव्हते. मात्र १३ जानेवारीला इंडिया आघाडीच्या बैठकीत नितीश कूमार यांची समन्वयक म्हणून निवड होणार अशी चर्चा असताना त्यांच्या नावाला स्वत: राहुल गांधी यांनी विरोध केला. त्यामुळे नितीश कुमारांना झटका बसला. कदाचित तेव्हाच त्यांच्या डोक्यात राजकीय षडयंत्र सुरू झाले असेल.

Nitish Kumar News In Marathi
Nitish Kumar News: बिहारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा?

नितीश कुमार यांनी इंडिआ आघाडीत पंतप्रधानपदाचे दावेदार करण्यात आले नाही. त्यामुळे ते अस्वस्थ होते. इंडिया आघाडीत आपल्या नेतृत्वाला महत्त्व नाही, असा त्यांना वाटले होते. यात प्रशांत किशोर यांनी देखील भर टाकली. इंडिया आघाडीत असताना नितीश कुमार यांना पाच जागा जिंकणेही अवघड जाईल, असे जाहिर विधान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले होते. यामुळे राजकीय अस्तित्व वाचवणे प्रमुख ध्येय असावे. (Latest Marathi News)

कारण राजकारणात दिसत तर सर्व हॅपनिंग नसतं. याची देखील मोठी प्रोसेस असते. इंडिया आघाडीत राहुन पंतप्रधान पदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही, त्यामुळे भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षासोबत जाऊन मुख्यमंत्री पद तरी कायम ठेवावं, असा विचार त्यांच्या मनात आला असेल.

ही संधी साधत भाजपने देखील डाव साधला. नितीश कुमार यांची नेहमी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी होती. ती मागणी नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळाल्यानंतर नितीश कुमार यांनी नाव न घेता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यामुळे नितीश कुमार एनडीए सोबत जाण्याची चर्चा सुरु झाली. नितीश कुमार हे इंडिया आघाडीपासून देखील दुर जात होता. भाजपने एक दगडात दोन पक्षी मारले एक म्हणजे इंडिया आघाडीत फुट पाडली दुसरं म्हणजे बिहार राज्य ताब्यात घेतलं.

Nitish Kumar News In Marathi
Nitish Kumar: बिहारमध्येही भाजपचा दोन उपमुख्यमंत्र्यांचा 'फॉर्म्युला'; आज सायंकाळी 5 वाजता शपथविधी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()