Nitish Kumar: नितीश कुमार पुन्हा एकदा यूटर्न घेण्याच्या तयारीत; आतापर्यंत केव्हा-केव्हा मारलीये पलटी?

Nitish Kumar May Exit Alliance: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा आपला गट बदलण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यूट्यर्न घेणार असून ते लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत जाणार आहेत.
Nitish Kumar
Nitish Kumar
Updated on

नवी दिल्ली- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा आपला गट बदलण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यूट्यर्न घेणार असून ते लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत जाणार आहेत. असे झाल्यास इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Nitish Kumar May Exit Alliance In Bihar Likely To Go With BJP Again)

बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा यांनी 'एकला चलो'चा नारा दिला. त्यानंतर पंजाबमध्ये भगवंत मान यांनी देखील स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या एकजुटीला मोठा तडा गेलाय. त्यातच आता नितीश कुमार हे देखील साथ सोडून गेल्यास इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे.

Nitish Kumar
Nitish Kumar: नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार? ममतांनंतर बदलला काँग्रेसबाबतचा सूर

नितीश कुमार हे ७२ वर्षीय आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी आतापर्यंत चारवेळा पलटी मारली आहे. आता पुन्हा एकदा ते भाजपसोबत गेले तर हा त्यांचा पाचव्यांचा गट बदलण्याचा निर्णय असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने नितीश कुमार यांना सोबत घेण्यास मंजुरी दिली आहे. बिहार विधानसभा देखील विसर्जित केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने आपल्या सर्व आमदारांना पाटण्याला बोलावलं आहे.

नितीश कुमार यांनी केव्हा-केव्हा मारली पलटी?

- २००४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार निवडले होते. याच्या विरोधात नितीश कुमार यांनी भाजपसोबतचे १५ वर्षांचे संबंध तोडले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, राहू किंवा मातीत मिळून जाऊ, पण तुमच्यासोबत हात मिळवणार नाही

- याच वर्षी निवडणुकील पक्षाच्या वाईट कामगिरीनंतर नितीश कुमारांची मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या पक्षाचे नेता जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं.

- २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या आधी नितीश कुमारांनी पुन्हा पलटी मारली. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत हातमिळवणी केली. महाआघाडीला निवडणुकीत विजय मिळाला. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करण्यात आले होते.

Nitish Kumar
INDIA bloc: नितीश कुमार यांनी उगाच नाही नाकारलं 'इंडिया'चं संयोजक पद! रणनीतीचा आहे भाग

- २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आश्चर्यकारक निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव IRCTC घोटाळ्यात आले होते. त्यानंतर नितीश कुमार यांनी महाआघाडी संपवत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर ते भाजपसोबत गेले आणि सरकार स्थापन केले.

- २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. नितीश कुमार यांनी भाजपसोबत मिळून निवडणूक लढली आणि ती जिंकली. निवडणुकीत जेडीयूला ४३ जागा मिळाल्या, तर भाजपला ७४ आणि आरजेडीला ७५ जागा मिळाल्या. तरी देखील नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान राहिले.

- दोन वर्षानंतर २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली. आता त्यांना भाजप त्रासदायक वाटू लागला. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजपची साथ सोडली. लगेचच त्यांनी आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत मिळून सरकार बनवले. तेजस्वी यादव यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री करण्यात आले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.