बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राज्याच्या विधानसभेत बोलताना पुन्हा जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. नितीश कुमार यांचा विधानसभेतील व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
बिहार विधानसभेच्या मॉन्सून सत्रादरम्यान विरोधीपक्षातील आमदार आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घालत होते. विरोधकांची मागणी होती की मागासवर्गीय, अतिमागास आणि दलित वर्गासाठी गेल्या वर्षी वाढविण्यात आलेल्या आरक्षणाच्या तरतुदीचा नवव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा. यादरम्यान नितीश कुमार म्हणाले की आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही लिहिले आहे. मात्र तरीही विरोधक शांत झाले नाहीत. यावर नितीशकुमार चांगलेच संतापले.
यावेळी नितीश कुमार यांनी आरजेडीच्या महिला आमदाराला उद्देशून वादग्रस्त विधान केले. आरक्षणाचा ९व्या सूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करणाऱ्या आरजेडीच्या आमदार रेखा देवी यांच्यावर भडकलेल्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी थेट अरे तू महिला आहेस, काही माहिती नाही का? या लोकांनी महिलांसाठी काही करून दाखवलंय का? २००५ नंतर महिलांना आम्हीच पुढे घेऊन गेलो आहोत. इतकंच नाही तर नितीश कुमार म्हणाले की, म्हणून सांगोतय गुपचूप ऐकून घ्या, ऐकणार नसाल तरी आम्ही ऐकवू. तरीही तुम्ही ऐकणार नसाल तर ती तुमची चूक आहे असेही सुनावलं.
यावर काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी “अरे महिला हो, कुछ जानती नहीं हो” या वाक्यावर आक्षेप घेत या वाक्याचा अर्थ काह होतो? असा सवाल नितीश कुमारांना विचारला आहे. इतक्या खालच्या पातळीचे वक्तव्य आणि महिलांप्रती अशा विचारावर लाज वाटत नाही? भाजप आणि महिला आयोगाचे कान बंद झाले असतील असेही श्रीनेत म्हणाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.