Nivas Pawar : शिरटे येथील निवास पवार यांनी केले अवयव दान

आजवर विक्रमी ६१ वेळा रक्तदानही केले आहे.
Nivas Pawar
Nivas PawarESakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : शिरटे (ता.वाळवा) या गावातील निवास आनंदा पवार यांनी वयाची ५३ वर्षे पूर्ण करताना इस्लामपूर येथे जायंटस ग्रुपच्या सभागृहात अवयवदान आणि देहदानाचे संकल्प पत्र अर्जुन पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. आपल्या अवयव दानातून अनेकांना पुनर्जन्म मिळावा ही आस मनी बाळगून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Nivas Pawar
Dhule News : शेतकऱ्यांना बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून द्या; ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी

इस्लामपूर येथील जायंटस ग्रुप या सेवाभावी संस्थेकडे निवास पवार यांनी पत्नी जयश्री पवार भाचे दिगंबर पाटील यांचे उपस्थितीत आपला संकल्प लिहून दिला.जायंट्स ग्रुपने आजवर १४८ नेत्रदान आणि १८ त्वचादान घडवून आणण्यात यश मिळविले आहे, त्यामुळे २९६ अंधाना दृष्टी मिळाली आहे. आजवर त्यांनी ६१ वेळा रक्तदानही केले आहे.

नेत्रदान आणि त्वचादान करण्यासाठी जायंट्सकडून डॉ. सदानंद जोशी, डॉ.राहुल मोरे, डॉ.अतुल मोरे, डॉ.प्रवीण पोरवाल तसेच नंदादीप आय हॉस्पिटल व सांगलीच्या रोटरी त्वचा बँकेकडुन सहकार्य मिळत आहे. जायंट्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील, फेडरेशन डायरेक्टर दुष्यंत राजमाने, समन्वयक भूषण शहा यांनी हे संकल्पपत्र स्वीकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.