No Confidence Motion: शहा दोन तास बोलले पण काँग्रेस खासदारानं दोनच वाक्यात दिलं खणखणीत उत्तर

उत्तरासाठी त्यांनी २ तासांहून अधिक काळ भाषण करत नवा विक्रम नोंदवला.
No Confidence Motion: शहा दोन तास बोलले पण काँग्रेस खासदारानं दोनच वाक्यात दिलं खणखणीत उत्तर
Updated on

No Confidence Motion : लोकसभेत आज विरोधकांनी आणलेल्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं. उत्तरासाठी त्यांनी २ तासांहून अधिक काळ भाषण करत नवा विक्रम नोंदवला. पण त्यांचं भाषण संपल्यानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केवळ दोनच वाक्यात त्यांना खणखणीत उत्तर दिलं. (No Confidence Motion Amit Shah spoke in Lok Sabha Adhir Ranjan Chaudhari gives reply)

No Confidence Motion: शहा दोन तास बोलले पण काँग्रेस खासदारानं दोनच वाक्यात दिलं खणखणीत उत्तर
एनी डेस्क (Any Desk) ऍप किंवा सॉफ्टवेअर वापरताय? सावधान ! नवी मुंबईत काय घडलंय वाचा

शहांनी सर्व आरोपांना दिली उत्तर

मणिपूरच्या मुद्द्यासह लोकसभेत सरकारविरोधातील सर्व आरोपांना गृहमंत्री अमित शहा यांनी आज एकहाती उत्तरं दिली. यामध्ये सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील योजना, कामं, संस्था संपवण्याचा मुद्दा, सरकारं पाडण्याचा मुद्दा, ईशान्य भारतातील अशांततेचा मुद्दा, युपीए सरकारचा भ्रष्टाचार यांसह मणिपूरच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. (Marathi Tajya Batmya)

No Confidence Motion: शहा दोन तास बोलले पण काँग्रेस खासदारानं दोनच वाक्यात दिलं खणखणीत उत्तर
एनी डेस्क (Any Desk) ऍप किंवा सॉफ्टवेअर वापरताय? सावधान ! नवी मुंबईत काय घडलंय वाचा

चौधरींची दोन व्याक्यात नेमकी प्रतिक्रिया

दरम्यान, अमित शहांच्या संपूर्ण भाषणानंतर अधीर रंजन चौधरी आपल्या जागेवरुन उठले आणि त्यांनी आपला मुद्दा मांडायला सुरुवात केली. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की, मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान बोलत नाहीत म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला जेणेकरुन ते यावर बोलतील. पण जे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायचं असतं ते कोतवाल कसं काय देतो? असा खडा सवालच त्यांनी सभागृहात केला. (Latest Marathi News)

No Confidence Motion: शहा दोन तास बोलले पण काँग्रेस खासदारानं दोनच वाक्यात दिलं खणखणीत उत्तर
No Confidence Motion: सुप्रिया सुळे, अमित शहा यांच्यात शाब्दिक चकमक; पवारांचा दाखला देत शहांनी खोडले आरोप

नंतर सभागृहाबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया देताना चौधरी म्हणाले, गृहमंत्री आणि सरकारनं आज लोकसभेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, ते मणिपूरच्या मुद्द्यावर गंभीर आहेत. गृहमंत्र्यांनी आपल्या मणिपूर दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं की, ते १५ दिवसांनंतर पुन्हा मणिपूरला जातील. तिथल्या लोकांशी त्यांनी १० वायद्यांवर भाष्य केलं होतं. त्या वायद्यांचं काय झालं? मुख्य मुद्द्यावर बोलण्याऐवजी ते आपल्या योजनांची माहिती देत राहिले. आमचा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा हेतू पंतप्रधानांना मणिपूरवर बोलण्यासाठी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.