No Confidence Motion Debate: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर PM मोदी आज देणार उत्तर, जाणून घ्या प्रमुख मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार
pm modi
pm modi sakal
Updated on

No Confidence Motion Debate : लोकसभेमध्ये आज (10 ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत 8 ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूरमधील परिस्थिती असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल (बुधवारी 9 ऑगस्ट) राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. त्याला गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार उत्तर दिलं.

pm modi
Earthquake in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतीमध्ये भूकंप, ३.४ रिश्टर स्केल तिव्रता

दरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधी खासदार अविश्वास ठरावाच्या चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोर जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं. आजही मतदान झाल्यास अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

pm modi
Satara : वर्षापूर्वीची 'ती' मागणी पूर्ण होताच उदयनराजेंनी मानले CM शिंदे, फडणवीस, अजितदादांचे आभार; काय आहे प्रकरण?

तर गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू आहे. त्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सभागृहात बोलावं अशी विरोधकांची मागणी होती. पण, पंतप्रधान सभागृहात बोलत नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला आहे. काल सभागृह काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत मणिपूर जळण्याला सरकार जबाबदार असल्याची टीका केली होती.

त्यामुळे पंतप्रधान नेमकं सभागृहात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मोदी सरकारच्या वर्षाच्या कार्यकाळात हा दुसऱ्यांदा विश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. सरकारकडं स्पष्ट बहुमत असल्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही.

pm modi
‘महावितरण’चा टोकाचा इशारा! ४८.५१ लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तुटणार; सुरक्षित ठेव भरण्यासाठी आता ३० दिवसांची मुदत

प्रमुख मुद्दे

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, त्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत संसदेत जोरदार चर्चा झाली आणि विरोधकांनी सरकारवर मणिपूरमध्ये मोठी फूट निर्माण केल्याचा आरोप केला. सरकारने आपल्या कल्याणकारी कामावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून स्वतःचा बचाव केला आहे.

काल संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारले की, पंतप्रधान अद्याप मणिपूरला का गेले नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या तीव्र विरोधादरम्यान ते म्हणाले, "पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत कारण ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत. तुम्ही (भाजप) मणिपूरचे विभाजन केले आहे."

अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान गुरुवारी लोकसभेत उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुजोरा दिला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी संसदेत बोलण्याची मागणी विरोधक करत होते.

लोकसभेत 331 सदस्य असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) अविश्वास ठरावामधून बाहेर पडण्याची अपेक्षा आहे. कनिष्ठ सभागृहात एकट्या भाजपचे 303 खासदार असून बहुमताचा आकडा 272 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.