PM Modi No Confidence Motion : अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? कसा आणला जातो अविश्वास प्रस्ताव?

No Confidence Motion
No Confidence MotioneSakal
Updated on

No Confidence Motion : अविश्वास प्रस्थाव म्हणजे काय ? तो पारित झाला तर काय होत? आणि तो कसा आणला जातो? असा प्रश्न कित्येक जणांना आज पडला असेल. कारण देशातील विरोधी पक्ष आज मोदी सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणत आहेत. विरोधी पक्षाच्या आघाडीने मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे.

आज का आणला जात आहे अविश्वास प्रस्ताव ?

मणिपूरच्या घटनेवरून संसदेत सुरु आहे. अशावेळी अविश्वास प्रस्ताव सरकारला मणिपूरच्या घटनेवर दीर्घ चर्चेला भाग पाडेल आणि पंतप्रधानांना धरता येईल असं मत विरोधकांच आहे. NDA कडे सध्या 329 खासदार आहेत. तर विरोधात 142 खासदार आहेत. बहुमत 269 ला आहे. अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या आघाडीत यावर सहमती बनली आहे. कमीत कमी ५० खासदारांच्या स्वाक्षरीचे अभियान यापूर्वीच सुरू केले आहे. आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

No Confidence Motion
Supreme Court On Modi Government : जिथे भाजप सरकार तिथे... ! सुप्रिम कोर्टाने मोदी सरकारवर ओढले ताशेरे

प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी आणला जात नाही

अविश्वास प्रस्ताव प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी आणला जात नाही. कशाप्रकारे देशात हुकुमशाही सरकार चालतंय आणि विरोधी पक्षांना अपमानित केले जातेय हे जनतेला कळायला हवे. यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आला आहे असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले.तर दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला केला आहे. यावेळी ते म्हणाले कि. काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावला आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कितीही अविश्वास प्रस्ताव आणला तरी काही बदलणार नाही.

No Confidence Motion
धोनीची बायको 'या' अभिनेत्याची जबरी फॅन..Sakshi Dhoni

कसा आणला जातो अविश्वास प्रस्ताव?

सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव नियम १९८ अंतर्गत लोकसभेत आणला जाऊ शकतो. हा प्रस्ताव मांडण्यासाठी कमीत कमी ५० विरोधी पक्षातील खासदारांचे समर्थन गरजेचे असते. लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणणे महत्त्वाचे पाऊल असते. ५१ टक्के खासदारांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले तर सरकार बहुमत गमावते. पर्यायी पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.