Amit Shah: 'ती' कलावती कोण? अमित शहांनी राहुल गांधींवर टीका करताना लोकसभेत केला उल्लेख

लोकसभेत आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची बाजू मांडली.
Amit Shah: 'ती' कलावती कोण? अमित शहांनी राहुल गांधींवर टीका करताना लोकसभेत केला उल्लेख
Updated on

Amit Shah on No Confidence Motion: लोकसभेत आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी गेल्या ९ वर्षात सरकारनं काय काय केलं याची माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याभाषणावर टीका केली.

ही टीका करताना त्यांनी कलावती नावाच्या एका महिलेचा उल्लेख केला. पण ही महिला कोण? तिचा संदर्भ का दिला? जाणून घेऊयात. (No Confidence Motion who is Kalavati which name is taken by Amit Shah)

राहुल गांधींना टार्गेट करताना शहा म्हणाले, "या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला आजपर्यंत १३ वेळा राजकारणात लॉन्च करण्यात आलं. पण ते १३ ही वेळाला फेल गेले आहेत. त्यांचा एक लाँचिंग मी बघितलं आहे. (Latest Marathi News)

Amit Shah: 'ती' कलावती कोण? अमित शहांनी राहुल गांधींवर टीका करताना लोकसभेत केला उल्लेख
Amit Shah on No Confidence Motion: जनतेच्या प्रश्नांसाठी नव्हे संभ्रमासाठी अविश्वास प्रस्ताव; शहांचं विरोधकांना प्रत्युत्तर

इथं सभागृहातच त्यांचं एक लॉन्चिंग झालं होतं. त्यावेळी त्यांनी बुंदेलखंडच्या एका कलावती नामक महिलेची कहानी सांगितली होती. या महिलेच्या घरी हे नेते जेवण करण्यासाठी गेले होते आणि इथेच मागे बसून त्या नेत्यानं या महिलेच्या गरिबीचं खूपच हृदयद्रवक वर्णन केलं. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. या घटनेनंतर त्यांचं सरकार सहा वर्षे चाललं. (Marathi Tajya Batmya)

Amit Shah: 'ती' कलावती कोण? अमित शहांनी राहुल गांधींवर टीका करताना लोकसभेत केला उल्लेख
Sharad Pawar: ...तर शरद पवारांना पंतप्रधान बनवून टाका; नाना पटोलेंचा PM मोदींवर पलटवार

पण मला हे विचारायचं आहे की, नंतर त्या कलावतीचं काय केलं? त्या कलावतीला घर, लाईट, कपडे, शौचालय, धान्य, आरोग्य आणि इज्जत देण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे, अशा शब्दांत शहांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.