PM Modi in Parliament:
नवी दिल्ली- एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारावर बोलावं अशी विरोधकांची इच्छा होती. दिड तासात मोदींनी मणिपूरचा मुद्दा न घेतल्याने विरोधकांनी सभात्याग केल्याचं पाहायला मिळालं. पण, जेव्हा विरोधकांनी सभात्याग केला तेव्हा मोदींनी मणिपूर विषयाला हात घातला. विरोधकांची मणिपूर विषयावर ऐकण्याची इच्छा नाही. त्यामुळेच त्यांनी सभात्याग केला. मणिपूर हिंसाचारात दोषी असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मोदी म्हणाले.
भारते मातेबाबत जे बोलण्यात आलं त्यामुळे भारतीय जनतेला ठेच पोहोचली आहे. सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत का? भारत मातेचे तुकडे करण्याचं कोणी कसं बोलू शकेल. काँग्रेसची भारताला तुकडे-तुकडे करण्याची परंपरा राहिली आहे. मी भारताच्या कानाकोपऱ्यात फिरलो आहे. तीन गोष्टी मी यासंदर्भात जनतेला मी सांगू इच्छितो. पाच मार्च १९६६ मध्ये काँग्रेसने मिझोराममध्ये नागरिकांवर हवाईदलाच्या माध्यमातून हल्ला केला होता. ते बाहेरील देशाचे नागरिक होते का? त्यांची सुरक्षा भारत सरकारची जबाबदारी नव्हती का? आजही मिझोराम ५ मार्च रोजी शोक व्यक्त करतो. आजही काँग्रेसला याचं दु:ख वाटत नाही. ही गोष्ट काँग्रेसने लपून ठेवली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे केल होतं. सुवर्ण मंदिरावर कोण हल्ला केला होता?, असं म्हणत मोदींनी टीका केली.
१९६२ मध्ये रेडिओ प्रशासन करण्यात आले होते. चीनने भारतावर हल्ला केला होता, अशावेळी आसामला पंडित नेहरुंनी वाऱ्यावर सोडलं होतं. काँग्रेसने कायम ईशान्य भारताला वेगळं ठेवलं आहे. ईशान्य भारताचा विकास केलेला नाही. लोहियांनी सांगितलं होतं की पंडित नेहरुंनी ईशान्य भारताला दुजाभाव दिला. काँग्रेसच्या भूमिकेमुळीच ईशान्य भारताचा विकास झाला नाही, असा आरोप मोदींनी केला.
भाजप सरकारच्या काळातच ईशान्य भारताला संधी मिळाली. ईशान्य भारताचा विकास होत आहे. मणिपूरमधील प्रश्नाला असं काही उपस्थित केलं जातंय जसं हा प्रश्न काल-परवाच निर्माण झाला आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की मणिपूरमधील प्रश्नाला काँग्रेस जबाबदार आहे. यासाठी मणिपूरचे लोक जबाबदार नाहीत. मणिपूरमधील लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. काँग्रेसच्या लोकांचे दु:ख सिलेक्टिव आहे. ते देश किंवा मानवतेच्या दृष्टीकोणातून विचार करु शकत नाहीत. ते फक्त राजकारण करु शकतात. कधीकाळी मणिूपरमध्ये अंशातता होती, दररोज हिंसाचार व्हायचा. पण, आता वातावरण बदलत आहे. येत्या काळात संपूर्ण ईशान्य भारत देशाचे महत्वाचे केंद्र बनेल, असं मोदी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.