Parliament Session 2024 : पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; ओम बिर्ला यांच्यासमोर के सुरेश मैदानात

Parliament Session 2024 : एनडीएने ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडिया आघाडीने काँग्रेसचे खासदार के सुरेश यांना सभापतीपदासाठी उभे केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
Parliament Session 2024 : पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; ओम बिर्ला यांच्यासमोर के सुरेश मैदानात
Updated on

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेसकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजप खासदार ओम बिर्ला यांनी 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

लोकसभा स्पीकरच्या पदासाठी सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये सहमति होऊ शकली नाही. आकडेवारी पाहता स्पीकर पदाच्या निवडणुकीत एनडीएचे स्थान मजबूत दिसते, पण INDIA आघाडीला वाटते की त्यांच्याकडे आपली ताकद दाखविण्याची संधी आहे. म्हणूनच, त्यांनी उपसभापती पद देण्याची अट न पाळल्यामुळे उमेदवार उतारला आहे. भारतीय लोकशाहीच्या ७२ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे की स्पीकर पदासाठी निवडणूक होणार आहे.

या परिस्थितीसाठी राहुल गांधी यांनी सरकारला जबाबदार ठरवले आहे. राहुल गांधी म्हणाले, विरोधकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे यावर राजनाथ सिंग यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन आला आणि त्यांनी म्हटलं की, तुम्ही आमच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. त्यावर संपूर्ण विरोधीपक्षांचं म्हणणं आहे की, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या लोकसभा अध्यक्षाला पाठिंबा देऊ. पण आमची मागणी ही आहे की, लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळायला हवं.

Parliament Session 2024 : पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; ओम बिर्ला यांच्यासमोर के सुरेश मैदानात
Rahul Gandhi : तुम्ही केलेल्या निर्व्याज प्रेमाबद्दल आभार..!;राहुल गांधी यांचे वायनाडच्या जनतेला भावनिक पत्र

राजनाथ सिंग यांनी काल रात्री म्हटलं होतं की, याबाबत मी पुन्हा फोन करतो असं त्यांनी खर्गेंना सांगितलं. पण अद्याप त्यांचा कॉल आलेला नाही. त्यामुळं मोदी जर म्हणत असतील की विरोधकांचं कन्स्ट्रक्टिव्ह सहकार्य हवं आहे आणि आता आमच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. त्यामुळं यांची नियत साफ नसल्याचं स्पष्ट होतं आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली

Parliament Session 2024 : पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक; ओम बिर्ला यांच्यासमोर के सुरेश मैदानात
Eknath Shinde : विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देतो,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : भंडारा येथे जलपर्यटनच्या कामाचे भूमिपूजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.