ना मास्क... ना सोशल डिस्टन्सिंग! शहांच्या रॅलीत नियमांची पायमल्ली

नेमकी कोरोना नियमावली कोणासाठी असा प्रश्न नियम पाळणाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
Amit Shah
Amit ShahANI
Updated on

बरेली : देशात एकीकडे ओमिक्रॉनच्या (Omicron Cases In India) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना उत्तर प्रदेशमध्ये (UP Assembly Election 2022 ) भाजपकडून कोरोना (Covid Protocol ) नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या बरेली येथील रॅलीमध्ये (Rally) लाखोंच्या संख्य लोक सहभागी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात ना कुणी मास्क घातलेला आहे ना कुणी सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठीची नियमावली नेमकी कोणासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (No Mask No Social Distancing In Amit Shah Rally In Bareilly)

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठीचे (UP Election 2022) वातावरण चांगलेच तापण्यास सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात सभा आणि रॅलींचे आयोजन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे देशात मोठ्या संख्येने ओमिक्रॉन बाधितांची संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून नव्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तर अनेक राज्यांमध्ये रात्रीच्या संचारबंदीसह जमाबबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र, शुक्रवारी बरेली येथील अमित शहांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांची संख्या पाहून कोरोनाचे नियम केवळ सामान्यांसाठीचं का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Amit Shah
ITR साठी उरले काही तास, अर्थ मंत्रालयाने सांगितले तारीख वाढणार नाही

तर तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार कोण ?

देशात वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या वाढत्या संख्येने एकीकडे चिंतेत भर पडली असून ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र आणि विविध राज्यांकडून अनेक निर्बंध (Center & States Imposed Restriction For Omicron) कडक करण्यात आले आहे. काही राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात जाहीर करण्यात आली आहे तर, काही ठिकाणी जमाबबंदी आदेश देण्यात आले आहेत. मात्र, केंद्राचे हे नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच का असा प्रश्न शुक्रवारी पार पडलेल्या अमित शहांच्या बरेली येथील रॅलीनंतर उपस्थित झाला आहे. राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या अशा रॅलींमधून जर कोरोनाची तिसरी लाट आली तर, त्यासाठी जबाबदार कोण असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.