पाकिस्तानात शिक्षण घेतलेल्यांना भारतात नोकरी नाही; UGC & AICTEचे आदेश

पाकिस्तानमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आता भारतात नोकरी मिळणार नाही
UGC & AICTE
UGC & AICTESakal
Updated on

नवी दिल्ली : अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने पाकिस्तानमध्ये उच्च शिक्षणासाठी न जाण्याचे निर्देश आता विद्यार्थांना दिले आहेत. पाकिस्तानमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आता भारतात नोकरी मिळणार नाही अशा सूचनांचं परिपत्रक विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारतीय तांत्रिक परिषदेने जारी केलं आहे.

(UGC & AICTE has advised students not to travel to Pakistan for pursuing higher education)

UGC & AICTE
मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने काल एक परिपत्रक जारी केलं असून त्यामध्ये त्यांनी भारतातील कोणत्याही नागरिकांनी पाकिस्तानात उच्च शिक्षणासाठी न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. पाकिस्तानातील कोणत्याही पदवी विद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार हे भारतात नोकरीसाठी पात्र धरले जाणार नसल्याची माहिती सदर पत्रकातून दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानात घेतलेल्या शिक्षणाच्या आधारे भारतात नोकरी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

UGC & AICTE
शताब्दी एक्सप्रेसमध्ये वादग्रस्त हेडिंगचे वर्तमानपत्र; IRCTCने दिले आदेश

दरम्यान ज्या नागरिकांनी पाकिस्तानमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं आहे असे नागरिक गृहमंत्रालयाच्या सुरक्षा मंजुरीनंतर भारतात नोकऱ्यांसाठी पात्र असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काही लोकं आणि त्यांचे मुलं भारतात विस्थापित झालेले आहेत त्यांना भारतात नोकऱ्या मिळणार आहेत असंही या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानातील नागरिकांना भारतात नोकऱ्या मिळणार नसून पाकिस्तानात शिक्षण घेतलेल्या भारतीयांनासुद्धा भारतात नोकऱ्या मिळणार नाहीत.

त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तानात उच्च आणि तंत्र शिक्षणासाठी न जाण्याचे निर्देश अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.