Sharad Pawar : 'हिंडेनबर्ग' प्रकरणात जेपीसीची मागणी निरर्थक', पण... ; शरद पवार यांचं मोठं विधान

Sharad Pawar and gautam adani
Sharad Pawar and gautam adani
Updated on

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून भारतीय राजकारणात सक्रीय असून लोकशाहीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचे मत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यातच हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी करण्यात येत आहेत. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं.

Sharad Pawar and gautam adani
Govt Scheme for Prisoners: गरीब कैद्यांना आर्थिक मदतीसाठी सरकारची विशेष योजना; केंद्र सरकारचा निर्णय

हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी अनावश्यक असल्याचं पवार यांनी म्हटलं. जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत राहिलं. त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही, अस मत पवार यांनी व्यक्त केला. तर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीकडून सत्य समोर येण्याची शक्यता अधिक असल्याचही त्यांनी नमूद केलं. एनडीटीव्हीला दिलेल्या एक्सक्लसिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

हिंडनबर्ग प्रकरणासंदर्भात शरद पवार म्हणाले की, विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले. या फर्मची पार्श्वभूमी कुणालाच माहित नाही, आम्ही त्यांचे नावही ऐकले नाही. या प्रकरणात एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar and gautam adani
Ashish Deshmukh: आशिष देशमुखांवर हाकापट्टीची टांगती तलवार! काँग्रेसकडून तीन दिवसांचा अल्टिमेटम

विरोधकांच्या जेपीसीच्या मागणीबाबत ते म्हणाले की, जेपीसी नेमून प्रकरण सुटणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून सत्य देशासमोर येईल. या प्रकरणात जेपीसीची गरज नाही आणि त्याने फरक पडणार नाही.

'आम्ही जेव्हा राजकारणात आलो तेव्हा सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी टाटा बिर्ला यांच्यावर हल्ला चढवला होतो. टाटांनी या देशासाठी किती योगदान दिले आहे, हे नंतर समोर आले. आजकाल टाटा बिर्ला यांच्याऐवजी अदानी, अंबानी यांच्यावर हल्ले होत आहेत. अदानी यांचे ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे, असंही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.