Jain Muni Case : जैन मुनींच्या हत्येबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; सिद्धरामय्या म्हणाले, तपास CBI कडं देण्याची..

जैन मुनी हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. जैन मुनींची हत्या हे क्रूर हत्याकांड आहे.
 Karnataka CM Siddaramaiah
Karnataka CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

एफआयआरमध्ये दोन आरोपींची नावे आहेत. दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मृतदेह सापडला आहे. पोलिसांचा दोष काय? असा सवाल त्यांनी केला.

बंगळूर : जैन मुनी कामकुमार नंदी महाराज (Jain Muni Kamkumar Nandi Maharaj) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. आमचे पोलिस याचा तपास करण्यास सक्षम आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

 Karnataka CM Siddaramaiah
PM मोदींच्या वाढदिनी नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत 7 चित्त्यांनी गमावला जीव

जैन मुनी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवावा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी केली. त्यावर सिद्धरामय्या (Siddaramaiah) म्हणाले, "जैन मुनी हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. जैन मुनींची हत्या हे क्रूर हत्याकांड आहे. "

एफआयआरमध्ये दोन आरोपींची नावे आहेत. दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मृतदेह सापडला आहे. पोलिसांचा दोष काय? असा सवाल त्यांनी केला. पोलिस (Karnataka Police) सक्षमपणे तपास करीत आहेत. हत्येमागे कितीही प्रभावशाली लोक असले तरी त्यांना शिक्षा करण्याचे काम आम्ही करू, असंही सिद्धरामय्यांनी स्पष्ट केलं.

 Karnataka CM Siddaramaiah
Mahadev Jankar : 'आता कोणाकडं तिकिटाची भीक मागणार नाही, मी देखील देशाचा पंतप्रधान होणार'

भाजपची सत्यशोधक पथके

बेळगावमधील जैन साधूची हत्या आणि म्हैसूरच्या टी. नरसीपूर येथील युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी भाजपने सत्यशोधक पथके तयार केली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील आणि सी. टी. रवी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पथके काम करतील आणि घटनांची सत्यता शोधण्याचे काम करतील, असे पक्षाने म्हटले आहे.

 Karnataka CM Siddaramaiah
Jain Muni Case : शरीराचे तुकडे करुन जैन मुनींची निर्घृण हत्या; गृहमंत्री म्हणाले, 'CBI कडं तपास देणार नाही'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()