Manipur News: देवाने बनवलेला VIDEO व्हायरल झाला!; पत्नीची नग्न धिंड काढण्यात आलेल्या कारगिल हिरोचे दु:ख

Manipur Violence मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार आणि महिलांची नग्न अवस्थेत काढण्यात आलेले धिंड यामुळे देशातील वातावारण गढूळ झालेलं आहे
Manipur Violence
Manipur Violenceesakal
Updated on

Manipur Violence

नवी दिल्ली- मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार आणि महिलांची नग्न अवस्थेत काढण्यात आलेले धिंड यामुळे देशातील वातावारण गढूळ झालेलं आहे. या घटनांवरुन संसदेत अजूनही गोंधळ सुरु आहे.

मणिपूर हिंसाचारादरम्यान ज्या महिलांना नग्न करुन धिंड काढण्यात आली होती, त्यातील एका महिलेचा पती कारगिल युद्धातील जवान राहिला आहे. कारगिल युद्ध लढलेले 65 वर्षीय माजी जवान यांनी म्हटलं की, 'सगळ्यांसमोर सत्य समोर यावं यासाठीच देवाने हा व्हिडिओ समोर आणला.'

मणिपूरमध्ये 4 मे रोजी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ 19 जुलै रोजी समोर आला होता. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. व्हिडिओमध्ये दोन महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढण्यात आली होती.

व्हिडिओ व्हायरल होताच लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. असं काही तरी आपल्या देशात घटतंय, असा अनेकांना विश्वास वाटला नाही. या घटनेनंतर मणिपूरमधील हिंसाचार देशात मोठ्या प्रमाणात चर्चीला जाऊ लागला.

Manipur Violence
Manipur Violence : उत्तरांच्या प्रतीक्षेत मणिपूर

65 वर्षीय कारगिल हिरोच्या पत्नीला जमावाने नग्न करुन 4 मे रोजी रस्त्यावर फिरवलं होतं. इंडियन एक्सप्रेसमध्ये दिलेल्या बातमीनुसार, कारगिल हिरोने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

तसेच देवानेच हा व्हिडिओ समोर आणला, जेणेकरुन सर्वांसमोर सत्य येईल, असं त्यानी म्हटलं. सदर घटना 4 मे रोजी घडली होती, पण काही काळाने म्हणजे 19 जुलै रोजी व्हिडिओ समोर आला आणि खळबळ उडाली. व्हिडिओ समोर आला नसता तर आरोपी मोकाटच राहिले असते का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Manipur Violence
Poppy Seeds : खसखस महागली! मणिपूर हिंसाचाराचा आयातीवर परिणाम, गृहिणींची चिंता वाढली

माजी जवानाचं म्हणणं आहे की, 'त्यांनी सैकुल पोलिस स्टेशनमध्ये 18 मे रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी एफआयआरही दाखल करुन घेतला होता. पण, व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क केलेला नव्हता. व्हिडिओ सर्वत्र पसरल्यानंतर पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधला.'

घटनेनंतर तात्काळ यावर कार्यवाही करणे आवश्यक होते, पण पोलिसांना याबाबत माहिती दिली तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला नाही. पण, जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हाच सर्वांना विश्वास वाटला.

त्यामुळे देवाने बनवलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला असं कारगिल युद्धाचे माजी जवान यांना वाटतं. पीडित महिला आणि त्यांचे कुटुंब सध्या चुराचांदपूर शहरातील एका कॉलेजमध्ये राहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.