हैदराबाद : कोव्हॅक्सिन (Covaxin) ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप किंवा अंग दुखत असल्यास त्यावर पॅऱासिटॅमोल (Paracetamol) ही टॅब्लेट घेण्याची गरज नाही, असं स्पष्टीकरण भारत बायोटेकनं दिलं आहे. लहान मुलांच्या लसीकरणादरम्यान काही लसीकरण केंद्रांवर लस घेतल्यानंतर मुलांना पॅरासिटॅमोल किंवा पेनकिलर गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर लस निर्मात्या कंपनीनं यावर स्पष्टीकरण दिलं. (No paracetamol recommended after being vaccinated with Covaxin says Bharat Biotech)
यासंदर्भात भारत बायोटेककडून एक पत्रकच जाहिर करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनीनं म्हटलं की, आम्हाला फिडबॅक मिळालाय की, मुलांसाठीच्या काही लसीकरण केंद्रांवर ५०० मिलीग्रॅमच्या तीन पॅरासिटॅमोल टॅब्लेट घेण्याचा सल्ला दिला जात आहे. पण कोव्हॅक्सिनची लस घेतल्यानंतर पॅरासिटॅमोल किंवा कोणत्याही पेन किलर घेण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.
आमच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ३०,००० लोकांवर चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये १० ते २० टक्के व्यक्तींना साईड इफेक्ट जाणवले आहेत. बऱ्याच जणांमध्ये हे साईड इफेक्ट सौम्य स्वरुपाचे आहेत, जे एक-दोन दिवसात निघून जातात. त्यामुळं त्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध घेण्याची गरज नाही. केवळ तुमच्या डॉक्टरांनी जर औषध गरजेची आहेत अशी शिफारस केली तर लस घेतल्यानंतर औषधांची गरज पडते.
कोव्हॅक्सिनला नव्हे तर इतर दुसऱ्या लसींसाठी पॅरासिटॅमोल टॅब्लेटची शिफारस करण्यात आल्या आहेत, असंही भारत बायोटेकनं आपल्या पत्रकातून स्पष्ट केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.