DY Chandrachud: पाकिस्तानी सुफी संताचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी, CJI चंद्रचूडांचा स्पष्ट नकार...नेमकं प्रकरण काय?

DY Chandrachud: परदेशी नागरिकाचे पार्थिव भारतात परत करण्याचा अधिकार नागरिकांना नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. प्रयागराज येथील सुफी दर्गाहचे संत हजरत शाह यांचे पार्थिव परत आणण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.
DY Chandrachud:
DY Chandrachudesakal
Updated on

DY Chandrachud: बांगलादेशची राजधानी ढाका येथून एका सुफी संताचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ही याचिका निकाली काढली आहे. ही याचिका CJI DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध होती, जी फेटाळण्यात आली.  सीजेआय चंद्रचूड म्हणाले की, जर ते भारतीय नागरिक असते तर आम्ही भारत सरकारला त्यांचे पार्थिव देशात आणण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले असते, परंतु या प्रकरणात आम्ही तसे करू शकत नाही.

सुफी संत हजरत शाह मुहम्मद अब्दुल मुक्तदीर शाह मसूद अहमद यांचे बांगलादेशची राजधानी ढाका येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, परदेशी व्यक्तीचा मृतदेह भारतात परत आणण्याचा अधिकार कोणीही सांगू शकत नाही. जर हे भारतीय नागरिक असते तर आम्ही सरकारला प्रयत्न करायला सांगू शकलो असतो. परदेशी नागरिकाचा मृतदेह भारतात आणण्याची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही.

DY Chandrachud:
RCB Bengaluru Water Crisis IPL 2024 : आरसीबीच्या होम टाऊनमध्ये पाणी संकट, KSCA ने बोलावली तातडीची बैठक

सुफी संत शाह मसूद अहमद हे पाकिस्तानी नागरिक होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बांगलादेशमध्येच दफन करण्यात आले. आता दर्गाह हजरत मुल्ला सय्यद यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून त्यांचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला विचारले की, तो पाकिस्तानी नागरिक आहे, अशा स्थितीत त्याचा मृतदेह भारतात आणावा, अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता?

तर दर्गाह हजरत मुल्ला सय्यदच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, सुफी संताचा जन्म प्रयागराजमध्ये झाला होता. नंतर ते पाकिस्तानात गेला आणि 1992 मध्ये त्यांना पाकिस्तानी नागरिकत्व मिळाले. 2021 मध्ये त्यांनी आपले मृत्युपत्र तयार केले होते ज्यात त्याने इच्छा व्यक्त केली होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याला भारतात असलेल्या दर्ग्यामध्ये दफन केले जावे.

DY Chandrachud:
PETA Letter to ECI : रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत खेकडा आणल्यानं 'पेटा'ला आला राग; थेट पत्र लिहून दिला इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.