आता शाळेत 'सर', 'मॅडम' नव्हे तर 'टिचर' म्हणायचं; बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश

Sakal exclusiv
Sakal exclusivesakal
Updated on

तिरुअनंतपुरम : केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (केएससीसीपीसीआर) राज्यातील सर्व शाळांना निर्देश दिलेत की, शाळेतील शिक्षकांना त्यांच्या लिंगाची पर्वा न करता 'सर' किंवा 'मॅडम' ऐवजी 'टीचर' म्हणून संबोधावे.

Sakal exclusiv
Shirdi Bus Accident : जखमींवर शासकीय खर्चातून उपचार; २ भाविकांची प्रकृती चिंताजनक, तर...

केएससीसीपीसीआरच्या आदेशात "सर" आणि "मॅडम" सारख्या शब्दांनी हाक मारणे टाळणे असं नमूद केले आहे. पॅनेलचे अध्यक्ष के. व्ही. मनोजकुमार आणि सदस्य सी. विजयकुमार यांच्या पॅनलने बुधवारी सामान्य शिक्षण विभागाला राज्यातील सर्व शाळांमध्ये टिचर हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले.

Sakal exclusiv
Joshimath : 'गडकरीकृत' विकास हिमालयात असा चालला आहे; विश्वंभर चौधरींचं टीकास्त्र

सर किंवा मॅडम याऐवजी 'टिचर' म्हटल्यास सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानतेची भावना रुजवण्यास मदत होते आणि शिक्षकांविषयीची त्यांची ओढही वाढू शकते, असेही बालहक्क आयोगाने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार 'सर' आणि 'मॅडम' म्हणणे बंद करून भेदभाव संपवण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं समजतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.