"ही इगोची वेळ नाही"; अल्वांकडून ममतांची समजूत काढण्याचा प्रयत्न

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींची भूमिका निराशाजनक असल्याचंही अल्वा यांनी म्हटलं आहे.
margaret-alva_Mamata Banerjee
margaret-alva_Mamata Banerjee
Updated on

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मतदान करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इच्छुक नाहीत. तृणमूल काँग्रेस उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचं ममतांनी जाहीर केलं आहे. यावर ही इगो करण्याची वेळ नाही, अशा शब्दांत अल्वा यांनी उत्तर दिलं आहे. (No time for ego Margaret Alva on TMC decision to skip vice presidential polls)

ट्विटरवरुन अल्वा यांनी ममतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, "तृणमूल काँग्रेसचा उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान न करण्याची भूमिका निराशाजनक आहे. आता ईगो आणि राग व्यक्त करण्याची ही वेळ नाही. ही वेळ धैर्य, नैतृत्वगुण आणि एकता दाखवण्याची आहे. मला माहितीए की ममता बॅनर्जी या मोठ्या धाडसी आहेत. त्यामुळं त्यांनी विरोधकांसोबत उभं रहायला हवं"

TMC उपराष्ट्रपती निवडणूक वगळणार

तृणमूल काँग्रेसने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तृणमुलशी चर्चा न करता अल्वा यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षानं उपराष्ट्रपतीपदासाठी केल्याचा आरोप करत याच्याशी आपण सहमत नाही, असं ममतांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी 22 जुलै रोजी टीएमसीच्या खासदारांसोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

एनडीएने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे, तर विरोधी पक्षांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी सल्लामसलत न करता विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार कसा जाहीर करण्यात आला, याबद्दल टीएमसीने आपला निषेध नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.