Nobel Prize 2023
Nobel Prize 2023 esakal

Nobel Prize 2023 : कोरोनाच्या काळात लाखो जीव वाचवणाऱ्या औषधासाठी मिळालं नोबेल, असा होता प्रवास..

या वर्षी वैद्यकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना देण्यात आले
Published on

Nobel Prize 2023 : या वर्षी वैद्यकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना देण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे. नोबेलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांच्या या शोधामुळे कोविड विरुद्ध एम-आरएनएची लस बनवणं सोपं झालं.

यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षी वैद्यकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना देण्यात आले. त्यांच्या या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे. नोबेलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांच्या या शोधामुळे कोविड विरुद्ध एम-आरएनएची लस बनवणं सोपं झालं.अशा परिस्थितीत, प्रश्न असा आहे की त्यांच्या कोणत्या कामगिरीमुळे कोविड लस बनवण्याचा मार्ग सुकर झाला? त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता?

Nobel Prize 2023
Health Care: कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी प्रत्येक महिलेने कराव्याच या 7 टेस्ट, जाणून घ्या

एम-आरएनए लस म्हणजे काय, आधी समजून घ्या

सामान्यतः, लस ही व्हायरसच्या मृत किंवा कमकुवत भागावर अवलंबून असते, जी मानवी शरीरात दिली जाते. जेणेकरून धोका कमी करता येईल. कालांतराने, लस बनवण्याची पद्धत बदलली आणि आता फक्त लस बनवण्यासाठी विषाणूच्या अनुवांशिक सामग्रीचा (एम-आरएनए) वापर केला जात आहे. मात्र, अशाप्रकारे लस तयार करण्यासही वेळ लागतो.

Nobel Prize 2023
Health Care News: तुम्हालाही सतत तोंड येण्याचा त्रास आहे का? काय आहेत कारणे, जाणून घ्या

mRNA ला मेसेंजर RNA असेही म्हणतात. हा अनुवांशिक कोडचा एक छोटासा भाग आहे, जो शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा एखादा विषाणू शरीरावर हल्ला करतो तेव्हा या m-RNA लसीमुळे शरीरात एक प्रोटीन (अँटीबॉडी) तयार होते जे रोगांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते. त्यामुळे शरीरात विषाणूशी लढणारे अँटीबॉडीज तयार होतात. यामुळेच जगात अशा प्रकारच्या आणखी लसी तयार केल्या जात आहेत.

Nobel Prize 2023
Child Health : कमी उंची ते मुलांच्या कंबरदुखीपर्यंत, बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घ्या चाइल्ड हेल्थ टिप्स

नोबेल विजेत्यांनी कोणती कामगिरी केली

17 ऑक्टोबर 1955 रोजी हंगेरीमध्ये जन्मलेल्या कॅटालिन कारिको यांनी एम-आरएनए तंत्रज्ञानावर काम केले. m-RNA चा शोध 1961 मध्ये लागला असला तरी त्यापासून शरीरात प्रथिने (अँटीबॉडीज) कशी तयार होतात हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांमध्ये स्पर्धा लागली होती. कारीकोही तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. या पासून त्यांना जुनाट आजारांवर लस तयार करायची होती. 1990 मध्ये, कारिको पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात कार्यरत होत्या, परंतु निधीच्या कमतरतेमुळे संशोधनाला गती मिळत नव्हती.

Nobel Prize 2023
Health Care News: वर्कआउट करताना रेझिस्टन्स बँड वापरण्याचे हे आहेत फायदे, जाणून घ्या

1997 मध्ये, ड्र्यू वेसमन पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात आले आणि त्यांनी कारीकोच्या प्रकल्पाला निधी दिला. व्यवसायाने इम्युनोलॉजिस्ट असलेल्या ड्र्यू वेसमन यांनी कारिकोच्या सहकार्याने m-RNA तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरुवात केली. 2005 मध्ये, त्यांच्या एकत्रित प्रकल्पावर एक शोधनिबंध प्रकाशित झाला.एम-आरएनए तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विषाणूंविरुद्ध लढण्याची मानवाची क्षमता कशी वाढवता येईल, हे या दोघांनी शोधनिबंधात सांगितले. यासोबतच या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने औषधे आणि लस कशी तयार करता येईल हेही सांगण्यात आले.

Nobel Prize 2023
Oral Health: आठवडाभर ब्रश न केल्यास काय होईल? अशी असेल दातांची स्थिती

त्यांचा शोध वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिला

एवढा मोठा शोध असूनही वर्षानुवर्षे त्याकडे लक्ष दिले गेले नाही, परंतु 2010 हे वर्ष टर्निंग पॉइंट ठरले. अमेरिकन शास्त्रज्ञ डेरिक रॉसी यांनी एम-आरएनए लस बनवण्यासाठी मॉडर्ना नावाची कंपनी उघडली. 2013 मध्ये, कारिकाला जर्मनीच्या बायोटेकमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष बनवण्यात आले. डेरिकने एम-आरएनए तंत्रज्ञानासाठी कॅरिको आणि वेसमन यांना नोबेल पारितोषिक देण्याची मागणी सातत्याने केली.त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर कोरोनाच्या काळात झाला आणि अनेक कंपन्यांनी एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित कोविड लस बनवली. आता त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()