Nobel Prize 2024: फिजिओलॉजी अन् मेडिसिनसाठी नोबेल जाहीर; व्हिक्टर अँब्रॉस अन् गॅरी रुव्हकून यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मायक्रो RNA आणि पोस्ट-ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील या RNA चा सहभाग यावर त्यांनी संशोधन केलं आहे.
Nobel Prize 2024: फिजिओलॉजी अन् मेडिसिनसाठी नोबेल जाहीर; व्हिक्टर अँब्रॉस अन् गॅरी रुव्हकून यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Updated on

Nobel Prize 2024 : प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारावर यंदा व्हिक्टर अँब्रॉस अन गॅऱी रुव्हकून यांनी मोहोर उमटवली आहे. फिजिओलॉजी अन् मेडिसिनसाठी त्यांना हा नोबेल जाहीर झाला आहे. मायक्रो RNA आणि पोस्ट-ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील या RNA चा सहभाग यावर त्यांनी संशोधन केलं आहे.

नेमकं काय आहे हे संशोधन?

"निमॅटोड सी इलेगन्समध्ये मायक्रो RNAs कसे काम करतात? या सध्याच्या गृहितकावर संशोधन पेपरमध्ये चर्चा करण्यात आली आहे. अँब्रॉस आणि रुव्हकून या दोघा संशोधकांनी सी इलेगन्सचा वापर मायक्रो RNAचा वापर जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आणि मानवांसह इतर प्राण्यांना लागू होणारी अंतरंग समजून घेण्याचं ज्ञान मिळविण्यासाठी मॉडेल म्हणून केला आहे"

या संशोधनात असं आढळून आलं की, सी. एलिगेन्समधील मायक्रो आरएनए विविध जैविक प्रक्रियांचं नियमन करतात. ज्यात अळ्यांमधील विकास, दीर्घायुष्य आणि न्यूरोनल विकास याचा समावेश आहे. त्यांनी मायक्रो आरएनए बायोजेनेसिस, स्थिरता आणि इतर अॅक्टिव्हिटी नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा देखील शोधल्या आहे. जसं की, अर्गोनॉट प्रथिनांचा सहभाग आणि मायक्रो आरएनए हे सायलेन्सिंग कॉम्प्लेक्सचं नियंत्रण करतात का? हे यामध्ये तपासलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.