Nobel Prize : भारताला भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक देणारा प्रश्न कोणता होता?

नोबेल पारितोषिकांची घोषणा पुढील आठवड्यात 2 ऑक्टोबरपासून होणार
Nobel Prize
Nobel Prize esakal
Updated on

Nobel Prize : नोबेल पारितोषिकांची घोषणा पुढील आठवड्यात 2 ऑक्टोबरपासून होणार आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार जगभरातील मानवी जीवनाला लाभदायक कार्यांसाठी दिला जातो. सहा श्रेणींमध्ये त्याचे विजेते घोषित केले जातात. हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली व्यक्ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर. मात्र, भारताचे भौतिकशास्त्र क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक रमन इफेक्टसाठी डॉ.सी.व्ही. रमण यांना देण्यात आला होता.

नोबेल पुरस्काराचे वेळापत्रक जाहीर झाले असून, विविध क्षेत्रात दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पुढील आठवड्यात 2 ऑक्टोबरपासून जाहीर होणार आहे. हा पुरस्कार मेडिसिन, केमिस्ट्री, लिटरेचर, पीस, इकॉनॉमिक्स आणि फिजिक्स या कॅटेगरीमध्ये दिला जातो, जगातील सर्व देशांप्रमाणे भारतालाही या पुरस्कारांच्या यादीत आपले नाव येईल की नाही याची प्रतीक्षा आहे.नोबेल पुरस्कार अशा लोकांना दिला जातो ज्यांनी त्यांच्या संशोधनातून किंवा सेवेद्वारे मानवजातीचे कल्याण केले आहे. हा पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या आधारावर दिला जातो, त्यात सुवर्णपदक, 10 दशलक्ष स्वीडिश क्रोना आणि प्रमाणपत्र असते.

Nobel Prize
Skin care tips: फेसवॉश नाही, तर या घरगुती गोष्टींनी धुवा चेहरा...त्वचेला मिळतील अनेक फायदे

भारताला अनेक नोबेल पारितोषिके मिळाली आहेत

भारताला आजवर अनेक नोबेल पारितोषिके मिळाली आहेत, पण हा पुरस्कार पहिल्यांदाच जिंकण्याचा विक्रम रवींद्रनाथ टागोरांनी केला. 1913 मध्ये त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. बंगाली भाषेतील साहित्यिक रवींद्रनाथ यांच्या कलाकृती जगभरातील लोकांनी वाचल्या आणि त्यांचे कौतुक केले. मात्र, भारताला विज्ञानातील पहिले नोबेल मिळवून देण्याचे काम डॉ.सी.व्ही. रमण यांनी केले. 1930 मध्ये भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात रमण इफेक्टचा शोध लावल्याबद्दल डॉ. रमण यांना सन्मानित करण्यात आले.

Nobel Prize
Diabetes Health Tips: रक्तातली साखर वितळवायचीय तर या झाडाचं पान खाल्लंच पाहीजे, हा प्रयोग नक्की करून पहा, फरक पडेल

तो प्रश्न काय होता?

सी व्ही रमण यांनी सागरी भागासाठी रमन इफेक्ट शोधला. समुद्र निळा का दिसतो याचा शोध त्यांनी लावला होता. लंडन ते बॉम्बे परतीच्या प्रवासात डॉ. रमण यांनी हा शोध लावला. या शोधापूर्वी, असे मानले जात होते की समुद्राचा निळा रंग आकाशाचे प्रतिबिंब आहे, हे स्पष्टीकरण लॉर्ड रेले यांनी दिले होते.

Nobel Prize
Weight Loss Tips : वजन झटक्यात कमी होईल, फक्त हा एक पदार्थ खाण्याची सवय लावून घ्या

संशोधन कसे केले गेले?

समुद्र निळा का असतो हे शोधण्यासाठी डॉ.रमण यांनी संशोधन प्रवास सुरू केला. त्यांनी जगाला सांगितले की, समुद्राचा निळा रंग पाण्याच्या रेणूंवर सूर्यप्रकाश पसरल्यामुळे येतो. जेव्हा सूर्यप्रकाश त्याच्या तरंगलांबीपेक्षा लहान कणांचा सामना करतो, तेव्हा तो वेगवेगळ्या दिशेने विखुरतो. हे संशोधन जगात रमन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. या शोधासाठी, त्यांना रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने 10 डिसेंबर 1930 रोजी डॉ. रमण यांना नोबेल पारितोषिक देऊन, भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली.

Nobel Prize
Hair Serum Tips : हेअर सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती ? केसांना होणारे ‘हे’ फायदे घ्या जाणून

खालील श्रेणीतील नोबेल पारितोषिकांची घोषणा या दिवशी केली जाणार आहे

2 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता: शरीरशास्त्र आणि औषध

3 ऑक्टोबर दुपारी 3:15 वाजता: भौतिकशास्त्र

4 ऑक्टोबर दुपारी 3:15 वाजता: रसायनशास्त्र

5 ऑक्टोबर दुपारी 4:30 वाजता: साहित्य

6 ऑक्टोबर दुपारी 2:30 वाजता: शांती

9 ऑक्टोबर दुपारी 3:15 वाजता: अर्थशास्त्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.