नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातील जेएसएस इंजिनीअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्या सिनियर्सने इतकी मारहाण केली की, त्याच्या खांद्याचे हाड पाच ठिकाणी फ्रॅक्चर झाले. पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सिनियर विद्यार्थ्यांना 'सर' न बोलल्यामुळे त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली. नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार सीनिअर विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या घटनेच्या चौकशीचे आदेशही व्यवस्थापनाने दिले आहेत. (Ragging news in Marathi)
19 वर्षीय पीडित मुलगी नोएडा सेक्टर-62 मध्ये असलेल्या जेएसएस कॉलेजमध्ये B.Tech पहिल्या वर्षात शिकत आहे. ही घटना ७ डिसेंबर रोजी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घडली होती, असं पिडीत विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
'घटनेच्या रात्री तिसऱ्या वर्षाच्या आरोपी विद्यार्थ्यांनी मद्यपान केले होते. त्याने मध्यरात्री माझ्या रूममेटला त्याच्या खोलीत बोलावले. त्याने मला त्याची असाईन्मेंट पूर्ण करण्यास सांगितले. मात्र मी असाईनमेंट पूर्ण करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने मला त्याच्या खोलीत बोलावले. मी घाबरलो आणि त्याच्या खोलीत गेलो. त्यावेळी ते सर्वजण सिगारेट ओढत होते. मी त्याला सांगितले की मला माझी स्वतःची असाईनमेंट पूर्ण करायची आहे... जेव्हा मी त्याच्याशी 'भाई' म्हणून बोललो, तेव्हा त्याने मला मान खाली घालून 'सर' म्हणायला सांगितले, असं पीडित विद्यार्थ्याने म्हटलं.
पीडित विद्यार्थ्यांने पुढे म्हटलं की, मी माझ्या खोलीत गेल्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास चार आरोपी वरिष्ठ विद्यार्थी माझ्या खोलीत आले. "माझ्या खोलीत आल्यानंतर त्यांनी माझ्या रूममेटला रूममधून बाहेर पाठवलं आणि दरवाजा आतून बंद केला. यानंतर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा हॉस्टेलचे वॉर्डन आले, तेव्हा त्यांनी मारहाण थांबवली.
दरम्यान माहिती मिळताच नोएडाला पोहोचलेल्या पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी नोएडा सेक्टर-58 पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी 10 डिसेंबर रोजी आरोपी वरिष्ठ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी विद्यार्थी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.