बंगळुरु : लग्नानंतर शाररिक संबंध प्रस्थापित न करणं ही क्रूरता नाही, अशी महत्वपूर्ण टिपण्णी कर्नाटक हायकोर्टानं केली आहे. एका पत्नीनं आपल्या पतीविरोधात कर्नाटक हायकोर्टात भादंवि कलम ४९८ अ अतंर्गत फौजदारी याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावत ही टिपण्णी केली. (Non Consummation Of Marriage Not Cruelty Under Section 498A IPC Karnataka High Court)
न्या. एम. नागप्रसन्न यांच्या एकल खंडपीठानं पती आणि त्याच्या आई-वडिलांनी दाखल केलेली याचिका स्विकारली तसेच लग्नानंतर २८ दिवसांनी पत्नीनं त्यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरवली. पत्नीनं दाखल केलेल्या याचिकेत तीनं पतीवर आरोप केला की, तिचा पती मोबाईलवर कायम अध्यात्मिक व्हिडिओ पाहत असतो त्यामुळं त्यानं लग्नानंतर शाररिक संबंध प्रस्थापित केले नाहीत. त्यामुळं हा प्रकार क्रूरतेच्या श्रेणीत येतो. (Latest Marathi News)
पत्नीनं याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
पत्नीनं याचिकेत म्हटलं की, तिचा पती ब्रह्माकुमारी समाजाचा अनुयायी आहे. त्यामुळं जेव्हा मी पतीच्याजवळ जाते तेव्हा म्हणायचा की त्याला शाररिक संबंध प्रस्थापित करण्यात कोणतंही स्वारस्य नाही. त्यामुळं जर पती ब्रह्माकुमारी समाजाचा अनुयायी आहे त्यामुळं याचिकाकर्त्या लग्न न करण्याचा पर्याय निवडू शकत होता. (Marathi Tajya Batmya)
कोर्टानं काय म्हटलं?
खंडपीठानं सुनावणी दरम्यान म्हटलं की, क्रूरतेचा अर्थ कोणासोबत जबरदस्तीनं एखादं आचरण करणं होय. यामुळं एखाद्या महिलेला आत्महत्या करायला भाग पाडणं किंवा महिलेच्या जीवनात गंभीर दुःख देणं किंवा तिच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कृती करणं होय. दुसरी गोष्ट अत्याचरासंबंधी आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे बेकायदा मागणी पूर्ण करण्याच्या हेतूनं जबरदस्ती करणं हे असू शकतं.
भादंवि कलम ४९४ अ मध्ये पती किंवा त्याचे नातेवाईकांना शिक्षा करण्याचं प्रावधान आहे. ज्यामध्ये महिलेसोबत क्रूरता केली गेली असेल. पण सध्याची याचिका पाहता यामध्ये भदंवि कलम ४९४ अ अंतर्गत क्रूरतेचा कोणताही घटक दिसत नाही. या प्रकरणात महिलेचे सासू-सासरे हे कधीच आपला मुलगा आणि सूनेसोबत एकाच घरात राहिले नाहीत ते वेगळे राहतात. त्यामुळं त्यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊ शकत नाही. जर या खटल्याला परवानगी दिली तर तो कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.