Noor Inayat Khan : टिपू सुलतानाची वंशज दुसऱ्या महायुद्धात बनली गुप्तहेर! हिटलरच्या नाझीसेनेला फोडला होता घाम

नूरच्या योगदानाबद्दल, फ्रान्सने तिला लष्करी सन्मान दिला, तर युनायटेड किंगडमने तिला मरणोत्तर सर्वोच्च नागरी सन्मान, जॉर्ज क्रॉस देऊन सन्मानित केलं. तिला शौर्य पुरस्कारही प्रदान करण्यात आला. तिचं लंडन मध्ये गार्डन स्क्वेअर जवळ एक स्मारक बांधलं.
Noor Inayat Khan : टिपू सुलतानाची वंशज दुसऱ्या महायुद्धात बनली गुप्तहेर! हिटलरच्या नाझीसेनेला फोडला होता घाम
Updated on

नूरच्या योगदानाबद्दल, फ्रान्सने तिला लष्करी सन्मान दिला, तर युनायटेड किंगडमने तिला मरणोत्तर सर्वोच्च नागरी सन्मान, जॉर्ज क्रॉस देऊन सन्मानित केलं. तिला शौर्य पुरस्कारही प्रदान करण्यात आला. तिचं लंडन मध्ये गार्डन स्क्वेअर जवळ एक स्मारक बांधलं.

नूर-उन-निसा इनायत खान ऊर्फ नूर इनायत खान. टिपू सुलतानची वंशज. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि फ्रान्सच्या वतीने हेर म्हणून सहभागी झालेली भारतीय वंशाचा अनोखा हिरा. जर्मनीत नाझी सैन्याने पकडले, खूप सारे अत्याचार केले. सलग 10 महिने सतत त्रास देऊनही तोंड उघडलं नाही. कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. संतप्त झालेल्या नाझींनी नूरला टॉर्चर चेंबरमध्येच गोळ्या घालून ठार केलं.

ही एक अतिशय मनोरंजक, उत्कंठा वाढवणारी कथा आहे. या धाडसी मुलीने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी मृत्यू मान्य केला पण देशाशी गद्दारी केली नाही. नूरच्या योगदानाबद्दल, फ्रान्सने तिला लष्करी सन्मान दिला, तर युनायटेड किंगडमने तिला मरणोत्तर सर्वोच्च नागरी सन्मान, जॉर्ज क्रॉस देऊन सन्मानित केलं. तिला शौर्य पुरस्कारही प्रदान करण्यात आला. तिचं लंडन मध्ये गार्डन स्क्वेअर जवळ एक स्मारक बांधलं. हे स्मारक देखील अद्वितीय आहे कारण कोणत्याही आशियाई महिलेच्या सन्मानार्थ समर्पित केलेले हे पहिल स्मारक आहे. फ्रान्स आणि ब्रिटनच्या इतिहासात नूरच्या बलिदानाची किंमत मोठी आहे. तिची शौर्यगाथा दोन्ही देशात प्रसिद्ध आहे.

वयाच्या 13 व्या वर्षी वडिलांचे निधन झाले

नूरचा जन्म 1 जानेवारी 1914 रोजी मॉस्को येथे झाला. तिचे वडील भारतीय आणि आई मूळची अमेरिकन होती. तिचे वडील हजरत इनायत खान हे म्हैसूर राज्याचे शासक टिपू सुलतान यांचे पणतू होते. ते धर्मगुरू होते. भारतीय सूफीवाद पाश्चिमात्य देशांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. नूर ही वीणा वाजवायची. मुलांसाठी कथा लिहायची. त्यावेळी तिने जातक कथेचं पुस्तक लिहिलं होतं.

हे कुटुंब मॉस्कोहून ब्रिटनला गेले तेव्हा नुकतेच पहिले महायुद्ध संपले होते. नूर सहा वर्षांची असताना हे कुटुंब फ्रान्सला गेले. पॅरिसजवळ हे कुटुंब ज्या घरात राहत होते ते घर त्यांच्या एका अनुयायाने हजरत इनायत यांना भेट म्हणून दिले होते. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी नूरने वडील गमावले त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण शिकून वडिलांचा वारसा पुढे नेण्याच्या इच्छेने नूरने संगीत शिकणे सोडले नाही. कथा लिहिणे हा तिच्या जीवनाचा छंद बनला. घरच्या गरजा भागवण्यासाठी नूरने फ्रेंच रेडिओसाठी काहीवेळ कामही केले.

Noor Inayat Khan : टिपू सुलतानाची वंशज दुसऱ्या महायुद्धात बनली गुप्तहेर! हिटलरच्या नाझीसेनेला फोडला होता घाम
Marathi Announcement : 'बंधू आणि भगिनींनो...'; SpiceJet च्या विमानात सहचालिकेने केली मराठीत उद्घोषणा | Video Viral

नाझींच्या अत्याचारामुळे रक्त उसळले आणि हवाई दलाची निवड केली

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिच्या आयुष्याला पुन्हा कलाटणी मिळाली. फ्रान्स आणि जर्मनीचे सैन्य समोरासमोर आले. त्यानंतर हे कुटुंब पुन्हा ब्रिटनमध्ये आले. नूरवर तिच्या वडीलांचा प्रभाव होता. नाझी अत्याचाराच्या कथा ऐकून तिला अस्वस्थ वाटू लागले. तिचे रक्त उसळले आणि ती 1940 मध्ये ब्रिटिश हवाई दलात दाखल झाली. वायरलेस ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण दिले. नूर वर्षभरातच अधिकारी झाली.

नंतर नूरची फ्रान्समधील युनिटसाठी निवड झाली. त्यानंतर तिला फ्रान्समध्ये गुप्तहेर म्हणून पाठवण्यात आले. तिथे नूरचे नाव मॅडलिन ठेवले. नूरसोबत आणखी दोन महिलाही होत्या. फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर या सर्वांनी परिचारिका म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे हेरगिरीचे काम सोपे झाले. काही महिन्यांनंतर, तिला जर्मन सुरक्षा सेवांनी अटक केली. दुसऱ्या महायुद्धातील नूर ही पहिली आशियाई गुप्तहेर होती.

Noor Inayat Khan : टिपू सुलतानाची वंशज दुसऱ्या महायुद्धात बनली गुप्तहेर! हिटलरच्या नाझीसेनेला फोडला होता घाम
Maratha Andolan : दिल्लीत मला विचारलं जरांगे पाटील है कौन? CM शिंदेंनी सांगितली आठवण

तिला तुरुंगात पाठवले, छळ केला पण तिने तोंड उघडले नाही

तिच्या अटकेनंतर अनेक अधिकाऱ्यांनी नूरची चौकशी केली पण त्यांना काहीही साध्य करता आले नाही. यावेळी संधी मिळताच नूर कोठडीतून फरार झाली. मात्र, तिला पुन्हा पकडण्याआधीच तिला थोडे अंतर जाता आले. नूरचा हेतू लक्षात घेऊन नाझी अधिकाऱ्यांनी तिला जर्मनीच्या तुरुंगात पाठवले. तिथे खूप अत्याचार करूनही अधिकाऱ्यांना तिचे खरे नाव कळू शकले नाही. पुढे दहा महिन्यांनंतर, नाझी अधिकार्‍यांनी तिला डाचाऊ छळ छावणीत तिच्या तीन साथीदारांसह गोळ्या घालण्याचे आदेश दिले आणि एक तरुण प्रतिभा अवघ्या 30 व्या वर्षी हे जग सोडून गेली.

नंतरच्या काळात नूर केंद्रित पुस्तकेही लिहिली गेली. भारतीय वंशाच्या लंडनस्थित पत्रकार श्रावणी बसूच्या स्पाय प्रिन्सेस: नूर इनायत खान या पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. याद्वारे नूर आणि तिच्या योगदानाबद्दल बरेच काही जाणून घेता येते. नूरच्या शौर्याच्या कहाण्या फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये सांगितल्या जातात. भारतात मात्र नूरबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.