नवी दिल्ली- उत्तर पूर्व दिल्लीमधील लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातून काँग्रेसकडून कन्हैया कुमार आणि भाजपकडून मनोज तिवारी मैदानात होते. मनोज तिवारी यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत कामय ठेवली. मनोज तिवारी यांनी जवळपास १.३० लाख मतांनी कन्हैया कुमार यांचा पराभव केलाय. मनोज तिवारी यांना ७.५ लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. तर, कन्हैया कुमार ६.२५ लाख मतं मिळाली आहेत.
दिल्लीतील सात पैकी सहा लोकसभा मतदारसंघामध्ये ६० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. अपवाद फक्त उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघाचा होता. याठिकाणी उच्चांकी ६२.८९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या ठिकाणी मतदारांनी कोणाला पसंती दिली याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती.
उत्तर-पूर्व मतदारसंघामधील सीलमनगर, मुस्तफाबाद हे मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघ आहेत, तर सीमापुरी, गोकुलपूर हे अनुसूचित जातींसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहेत. या भागांतील मुस्लीम आणि दलित मतदार काँग्रेस आणि आपच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता होती. याशिवाय काँग्रेसने या मतदारसंघामध्ये चांगलाच संघटनात्मक जोर लावला होता. त्यामुळेच मतदानाचा टक्का वाढल्याचं सांगितलं जातं.
भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये दिल्लीतील सर्व सात जागा जिंकून आपला दबदबा निर्माण केला होता. पण, सध्या समीकरण बदलेलं होतं. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीत उतरले होते. त्यामुळे भाजपने सात जागांपैकी सहा मतदारसंघामध्ये नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले होते. फक्त मनोज तिवारी यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. २०१४ आणि २०१९ मध्ये उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी विजयी झाले होते.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हे त्यांच्या आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात. त्यांनी यावेळी आक्रमक प्रचार देखील केला होता. शिवाय गेल्या १० वर्षांतील तिवारी यांच्या कामावर त्यांनी सडकून टीका केली होती. पण, भाजपने देखील मतदारसंघ स्तव:जवळ ठेवण्यासाठी जोर लावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.